Jaisingpur Railway Station case in kolhapur marathi news 
कोल्हापूर

अन् स्टेशनवरच प्राध्यापकास केली मारहाण...

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर) : नोकरीतून निलंबित केल्याचा राग मनात धरुन जयसिंगपूर येथील फिरोज चंदूलाल काझी (वय ३७) यांना तत्कालीन शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक राम दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासह सहा जणांनी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरुन मारहाण करून अपहरण केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाणे व मिरज रेल्वे पोलिसात झाली आहे. यामध्ये फिरोज काझी यांच्या तोंडाला दुखापत झाली आहे.


याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की

फिरोज काझी व राम दत्तात्रय सूर्यवंशी शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, काझी यांनी राम सूर्यवंशी यांची बदनामी केल्याने राम सूर्यवंशी यांचे निलंबन केल्याचा राग सूर्यवंशी याला होता. मंगळवारी सकाळी काझी जयसिंगपूर रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी राम सूर्यवंशी, मारुती दत्तात्रय सूर्यवंशी व बाळकृष्ण दत्तात्रय सूर्यवंशी (रा.मजरेवाडी, ता. शिरोळ) यांनी तिकीट काऊंटरपासून जबरदस्तीने ओढत नेवून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर फिरोज काझी यांना चारचाकी वाहनात बसवून सांगली-कोल्हापूर बायपास मार्गाने तमदलगे, चौंडेश्वरी, नांदणी नाका, भैरेवाडी, कुरुंदवाड अशा मार्गे मजरेवाडी येथील माळरानावर आणले. या ठिकाणी त्यांच्या गळात असलेली सात ग्रॅम सोन्याची चेन व रोख रक्कम काढून घेतली.


त्यानंतर तुझ्यामुळे माझी बदनामी झाली असून आता तुला सोडत नाही, असे म्हणून लाकडी बांबूने तोंडावर, नाकावर, डोकीवर जबर मारहाण केली. त्यानंतर काझी यांच्या फोनवर नातेवाईकांचा फोन आल्यानंतर सुर्यवंशी यांनी नातेवाईकांना विविध ठिकाणी यायला सांगितले. यावेळी त्यांचे नातेवाईक मुसा काझी व भाऊ अमजद काझी त्या ठिकाणी गेले. व झालेल्या प्रकाराची कुठे तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही. अशी धमकी दिली. त्यानंतर काझी यांनी थेट जयसिंगपूर पोलिस ठाण्यात येवून राम सुर्यवंशी यांच्या तीन भावासह अनोळखी चार जणांविरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाणीचा थरार 
काझी हे कोल्हापूरला जाण्यासाठी जयसिंगपूर रेल्वे स्थानकात आले होते. राम सुर्यवंशी यांच्यासह तीन भाऊ व अन्य इसमांनी रेल्वे स्थानकावरुन ओढत आणून काझी यांना मारहाण केली. दरम्यान, सकाळी जयसिंगपूर रेल्वे स्थानकात मोठी गर्दी असताना या मारहाणीचा थरार पाहयला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT