Kolhapur Bandh Jalna Maratha Reservation  esakal
कोल्हापूर

Kolhapur Bandh : अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर कडकडीत बंद; तब्बल 300 कोटींची उलाढाल ठप्प, सर्व घटकांचा आंदोलनाला पाठिंबा

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनी पाठिंबा दिला.

सकाळ डिजिटल टीम

शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये काही उद्योजकांनी कारखाने बंद ठेवले.

कोल्हापूर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे (Jalna Maratha Reservation) मराठा आंदोलकांना (Maratha Andolan) झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात काल (मंगळवार) सकल मराठा समाजातर्फे कडकडीत बंद (Kolhapur Bandh) पाळण्यात आला. समाजाने दिलेल्या हाकेला व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनी प्रतिसाद दिला.

त्यामुळे सुमारे ३०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. औद्योगिक वसाहतींमधील बहुतांश कारखान्यांतील यंत्रांची धडधड बंद होती. समाजाने सोमवारी दसरा चौकात ‘जबाव दो’ आंदोलन करून मंगळवारी कोल्हापूर बंद पुकारला. त्याला प्रतिसाद म्हणून व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली.

लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार, शाहूपुरी, राजारामपुरी, महाद्वाररोड, लक्ष्मीरोड, शिवाजीरोड, बाजारगेट, लुगडी ओळ, पापाची तिकटी, महापालिका परिसर आदी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर परिसरातील वाहनांच्या शोरूम, गॅरेज, मशिन शॉप बंद होती.

त्याबाबतचे फलक त्यांनी दरवाजांवर लावले होते. दुकाने, व्यापार-व्यवसाय बंद राहिल्याने नेहमीच्या गजबजलेल्या ठिकाणी वर्दळ नसल्याने शांतता होती. औषध दुकाने सुरू होती. दरम्यान, सायंकाळी पाचनंतर शहर आणि उपनगरातील काही दुकाने अर्धे शटर उघडून सुरू झाली.

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनी पाठिंबा दिला. बंदमुळे सुमारे ३०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. त्यात धान्य, कपडे, सराफ, इलेक्ट्रॉनिक साहित्य, गणेशोत्सवासाठीचे डेकोरेशन साहित्य आदी बाजारपेठांतील उलाढालीचा समावेश आहे.

- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

सराफ बाजार बंद

गुजरी परिसरातील सराफ व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून समाजाला पाठिंबा दिला. सराफ बाजार कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी सांगितले.

यंत्रांची धडधड थांबली

शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये काही उद्योजकांनी कारखाने बंद ठेवले. एस. टी. आणि केएमटी बस सेवा बंद राहिली. अत्यावश्‍यक आणि जीवनावश्‍यक उत्पादनांचे कारखाने सुरू राहिल्याचे ‘गोशिमा’चे अध्यक्ष दीपक चोरगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT