key to washing became revival historical marathi news
key to washing became revival historical marathi news 
कोल्हापूर

"धुण्याची चावी' पुन्हा अडगळीत

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान वेगाने विस्तारले. जलस्त्रोत प्रदूषणमुक्तीच्या अनेक नवीन संकल्पना पुढे आल्या; पण कोल्हापूरचा श्‍वास असलेल्या रंकाळा प्रदूषणमुक्तीचा विचार 137 वर्षांपूर्वी झाला आणि त्यातूनच "धुण्याची चावी' आकाराला आली. बहुआयामी असलेली ही योजना मोडकळीस आली. योजनेच्या जतनासाठी येथे महापालिकेच्या माध्यमातून स्मृती उद्यान उभारले गेले. नोव्हेंबर 2004 मध्ये या उद्यानाच्या लोकार्पणाचा सोहळा तत्कालीन आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. 


धुण्याची चावी म्हणजे कपडे धुण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी, जनावरांच्या पाण्यासाठी किंवा त्यांना धुण्यासाठी एकाच ठिकाणी केलेली बहुआयामी योजना आहे. आपल्याकडे आजही प्रदूषण करू नका, असे आवाहन केले जाते. मात्र, लोकांना पर्याय दिले जात नाहीत. परंतु, रंकाळा तलाव प्रदूषणमुक्तीसाठीचा असा शाहूकालीन पर्याय म्हणून आजही ही योजना मार्गदर्शक ठरते. रंकाळा तलावातून रंकाळा टॉवरमार्गे सायफन पद्धतीने या ठिकाणी पाणी आणण्यात आले. त्याच्यासाठी कोणतीही इतर ऊर्जा वापरावी लागत नाही. 1883 ला ही योजना कार्यरत झाली.

दगडी कट्टे बांधून 120 नळ येथे जोडले. प्रत्येक नळाखाली दगडाचे एक कुंड व कपडे धुण्यासाठी मोठा घडीव दगड. अंघोळीसाठी 38 स्वतंत्र स्नानगृहेही येथे बांधली. या ठिकाणी पाण्याचा वापर झाल्यानंतर या कुंडातून बाहेर पडणारे पाणी पाटाद्वारे शेतीला पुरवण्यात आले. योजनेसाठी त्यावेळी 25 हजार 740 रुपये इतका खर्च आला होता. मात्र, नंतरच्या काळात त्याच्या जतन व संवर्धनासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला. 2004 मध्ये तत्कालीन नगरसेवक सुजय पोतदार यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या स्मृती उद्यानासाठी दहा लाखांचा खर्च झाला. मात्र, मूळ बांधकामाला कोणतीही इजा न पोचवता उद्यानाचे काम पूर्ण झाले. 120 नळापैकी सत्तर ते ऐंशी नळ चालू होते. मात्र, चार-पाच वर्षांपूर्वी बहुतांश सर्वच नळ मुख्य जलवाहिनीत गाळ साठल्याने बंद पडले. डिसेंबर 2015 मध्ये मुख्य जलवाहिनीतील गाळ काढून 29 नळ सुरू केले. 

आपत्कालीन पर्यायी व्यवस्था 
शहरातील नळपाणी पुरवठ्यामागील साडेसाती अद्यापही तशी फारशी सुटलेली नाहीच. गळती आणि विविध कारणांनी अमूक अमूक या काळात पाणीपुरवठा होणार नाही, अशा बातम्या महिन्यातून किमान दोन-तीन वेळा महापालिकेला हमखास प्रसिद्ध कराव्या लागतात. शहराच्या डी वॉर्डात मात्र काही कारणांनी तीन-चार दिवस पाणीपुरवठा झालाच नाही तर मग मात्र साऱ्यांचेच लोंढे धुण्याच्या चावीकडे वळतात. सद्यस्थिती पहाता "धुण्याची चावी' पुन्हा अडगळीत निघाली आहे. मात्र, एक ऐतिहासिक वारसा आणि नळ पाणी वितरणातील आपत्कालीन पर्यायी व्यवस्था म्हणूनही हा ठेवा जपायलाच हवा.  

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT