Knockout and Tuborg found in the fridge in ichlkarnji kolhapur marathi news 
कोल्हापूर

एकीकडे लाॅकडाऊन तर दुसरीकडे फ्रीजमध्ये सापडले नॉक ऑऊट व टुबर्ग....

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील गावभाग पोलिसांनी येथील आरगे भवनच्या पिछाडीस एका घरावर छापा टाकून बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत फ्रीजसह मोटर सायकल असा  ४८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शुभम नितीन नगरकर  (वय १९) याला अटक केली आहे. गुरूवारी रात्री साडेआठ वाजता ही कारवाई करण्यात आली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीस प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे विक्रीच्या उद्देशाने मद्यसाठा करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर गावभाग पोलिसांनी नगरकरच्या घरावर छापा टाकला. यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेल्या नॉक ऑऊट व टुबर्ग या दोन वेगवेगळ्या कंपनीच्या चार बियरच्या बाटल्या तसेच खाकी बॉक्समध्ये इंपेरीयल ब्ल्यू या कंपनीच्या विदेशी मद्याच्या आठ बाटल्या जप्त केल्या.

मद्यसाठा कोठून आला ..?

या कारवाईत सात हजार रुपये किमतीचा फ्रीज व चाळीस हजार रुपये किमतीची मोटर सायकल असा मुद्देमालही या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. लॉक डाऊन असतानाही मद्यसाठा कोठून आणला याचा शोध पोलीस घेत आहेत. संशयीत नगरकर याच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करणे तसेच महाराष्ट्र दारू बंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT