Kolhapur Band News Updates esakal
कोल्हापूर

Kolhapur Riots : बंदला हिंसक वळण; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांनी काय दिली प्रतिक्रिया?

महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराने चालणारे राज्य आहे.

सकाळ डिजिटल टीम

या घटनेत दोन तरुण आणि पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तूर्त शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Kolhapur Band News Updates : कोल्हापूर बंदला काल हिंसक वळण लागलं. निदर्शनं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते तेथून विविध भागांमध्ये पांगले आणि शहरात 13 ठिकाणी दगडफेकीचे प्रकार झाले.

दरम्यान, संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी (Kolhapur Police) लाठीमार केला. भाऊसिंगजी रोडवर अश्रुधुराचा वापर करून दगडफेक करणाऱ्या तरुणांना पांगविण्यात आलं. या घटनेत दोन तरुण आणि पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तूर्त शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, हिंसक वळण लागलेल्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीये. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूर येथे घडलेल्या प्रकाराबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही. गृहमंत्री सर्व प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. सर्वांनी शांतता राखावी.

-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कोल्हापुरातील विरोधी पक्षाचे नेते म्हणतात ‘मला माहिती आहे दंगल घडविण्यात येणार आहे’. त्यानंतर काही युवक औरंगजेब, टिपू सुलतानचे उदात्तीकरण करतात. त्यानंतर प्रतिक्रिया उमटते. या विधानाचा आणि घटनांचा काही संबंध आहे का? अचानक औरंगजेबाचे उदात्तीकरण कसे आले? याला कोण फूस लावत आहे. या सगळ्याची चौकशी सुरू आहे. चुकीचे खपवून घेणार नाही.

-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचे समर्थन करण्याचे काहीच कारण नाही. कोणीही त्याचं समर्थन करणार नाही. अशा बातम्यांच्या माध्यमातून समाजामध्ये कोणी तेढ निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायलाच हवी. कारवाई करण्यासाठी पोलिसांना मोकळीक द्यावी.

-अजित पवार, विरोधी पक्षनेते

महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराने चालणारे राज्य आहे. कोल्हापुरात जमाव प्रक्षुब्ध का झाला? हे पाहावे लागेल. तेढ निर्माण करणारे कोण आहेत? त्यांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी राज्याच्या गुप्तचर खात्याकडून चौकशी व्हायला हवी. राज्याच्या प्रगतीला जाणीवपूर्वक खीळ घातली जात आहे.

-शंभूराज देसाई, मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT