crime news esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : डोळ्यात चटणी टाकून १ लाख १५ हजार लुटले

हलकर्णीत दगडाने मारहाणीत एक जखमी

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज - डोळ्यात चटणी टाकण्यासह दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन १ लाख १५ हजार रुपये लुटल्याची घटना हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे मंगळवारी (ता. २३) रात्री घडली. मारहाणीत अजित ढेंगे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर, सध्या रा. हलकर्णी) हे जखमी झाले आहेत. घटनेतील अज्ञात हल्लेखोर पसार झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, ढेंगे हे दोन वर्षांपासून हलकर्णीच्या खडी क्रशर कंपनीत अकाऊंट मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. यामुळे ते कोल्हापूरहून हलकर्णीतच स्थायिक झाले आहेत. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे नऊ वाजता मोपेडने (केए ३०, ए ३०७०) कामावर पोहचले. दिवसभर क्रशरवर जमलेले १ लाख १५ हजार रुपये काळ्या रंगाच्या बॅगेत भरुन ते घराकडे घेवून येत होते.

रात्री पावणे नऊच्या सुमारास एमएसईबी रोडवरुन राजू पाटील यांच्या शेताजवळच्या चढावर आले असता तोंडाला रुमाल बांधलेल्या अनोळखी व्यक्तीने ढेंगेंच्या डोळ्यात चटणी टाकली. खिशातून पैशाचे पाकीट काढून घेण्याचा प्रयत्न केला.

त्याला प्रतिकार करत असताना ढेंगे यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. तेंव्हा ढेंगे यांनी आरडाओरड केली. परंतु अंधार असल्याने कोणीच मदतीला आले नाही. त्यानंतर हल्लेखोर १ लाख १५ हजार रुपये असलेली काळ्या रंगाची बॅग घेवून पसार झाला.

दरम्यान, ही घटना एका ओळखीच्या डंपर चालकाच्या लक्षात येताच त्याने डंपर मालकाला मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर क्रशरवरील सुनील तुपूरवाडी व चंदू रवेदार हे मोटारीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी ढेंगे यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून ढेंगे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी भेट देऊन पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Results 2026 : पुणे-नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव; शिवसेनेवर बन यांचा घणाघात, म्हणाले- महायुतीचा धर्म पाळला असता तर...

Railway Vacancies: रेल्वेत स्टेशन मास्टर पदासाठी भरती! १,२५० जागा, अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता अन् अंतिम तारीख

Pune MLC Election Result : पदवीधरांकडून भाजपला थेट धोक्याचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय वाऱ्याची चाहूल; युवा वर्गाच्या तीव्र असंतोषाची स्पष्ट पावती!

Spain Train Crash: स्पेनमध्ये रेल्वे अपघातात ६४ ठार; एकाच दिशेला जाणाऱ्या दोन वेगवान गाड्यांची धडक

Latest Marathi News Update : कुणाल मार्केट इमारतीत भीषण आग; 17 दुचाकी, 4 चारचाकी जळून खाक

SCROLL FOR NEXT