Kolhapur district chief executive officer complains to departmental officers 
कोल्हापूर

इगो दुखावला की कायदा अन्‌ गोरगरीबांना इंग्लिशमधून शिव्या 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : साहेब यांचा इगो दुखावल की कायदा काढतात. गोरगरीबांना इंग्लिशमधून शिव्या देतात. आम्ही निवेदनत द्यायला गेलो तर हे माझं कार्यालय आहे. येथे यायचं नाही, अशी धमकी देतात, अशी रोख-ठोक तक्रार करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमत मित्तल यांची विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडे तक्रार केली. तसेच, जिल्हा परिषदेमध्ये सरळ सेवेतून भरती झालेल्या पद्मावती पाटील यांना कामावरून कमी करून परस्पर दुसऱ्या महिलीची भरती करून गैरव्यवहार करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने अध्यक्ष रूपेश पाटील यांनी केली. 

यावेळी पद्मावती पाटील म्हणाल्या, कोणतेही कारण न देता कामकावरून कमी केले आहे. तसेच, जिल्हा परिषदेने परस्पर पत्र व्यवहार करून सांगली येथील एका महिलेला माझ्या ठिकाणी नियुक्त केले आहे. त्यामुळे कुटूंबाचे सक्तीचे उपोषण सुरू आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या या अन्यायाचा तात्काळ छडा लावावा अशीही मागणी पाटील यांनी केली. तसेच जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा कामावर घेतले नसल्यास मुलांसह कुटूंब जिल्हा परिषद आमरण उपोषण केले जाईल, अशा इशाराही पाटील यांनी दिला. 

पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेचेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सरळसेवितून भरती असताना दुसऱ्या महिलेची नियुक्ती झालीच कशी या मागणीचे निवेदन देण्यासाठी गेला असता संघटनेच्या जोरावर आमच्यावर दबाव टाकता काय? तुम्हाला अडकवून टाकीन अशी धमकी दिली असल्याचेही पाटील यांनी डॉ. म्हैसेकर यांना सांगितले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनीच पद्मावती पाटील यांना नोकरीत कायम केले असल्याचे सांगितले आहे. पण, पाटील या सध्या कामावरून कमी केल्यामुळे घरीच आहेत. याबाबत म्हैसकर यांनी मित्तल यांना विचारले असता त्यांना ठाम असे उत्तर देता आले नाही. यावेळी, भगवान कोईगडे, मदन परीट, विकी जाधव, संभाजी पाटील, अरूण जकाते, संताजी घोरपडे, चारूशिला पाटील, रंजना पाटील, त्वरिता पाटील, सुमन वागळे उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT