मुरगूड : निपाणी-देवगड रस्त्याचे काम जितेंद्रसिंग कंपनीकडे आहे. पण ते काम बंद करुन बसलेत. ते कोर्टात गेले तर काम लांबेल म्हणून अधिकारी नरमाईने बोलतात. मी आणि खासदार संजय मंडलिक येत्या आठ दिवसात त्यांना बोलावून ते जर रस्ता करणार नसतील तर त्यांना हे काम सोडायला लावण्यासाठी डोक्यावर उभे केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. निढोरी (ता. कागल) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक, कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, युवराज पाटील, प्रविणसिंह पाटील, केशवराव पाटील आदी उपस्थित होते. बिद्रीचे संचालक गणपतराव फराकटे अध्यक्षस्थानी होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘भाजपच्या काळात चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यावेळी त्यांनी ‘हायब्रीड अन्युटी’ तून प्रायोगिक तत्त्वावर देवगड-निपाणी रस्ता मंजूर केला. आणि या रस्त्याचा अक्षरशः बट्ट्याबोळ केला.’’ खासदार मंडलिक म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधी म्हणून हा रस्ता लवकर पूर्ण करण्याची आमची जबाबदारी आहे. मुरगूड पोलिसांनी चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल केले आहेत. रस्त्याबद्दल अनावधानाने धक्काबुकी झाली असेल तर खेद व्यक्त करतो. पण पोलिसांची मुजोरी अजिबात खपवून घेणार नाही.
गावागावात आंदोलने होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिस जबाबदार राहतील.’’यावेळी अतुल जोशी, देवानंद पाटील यांची भाषणे झाली. उपसरपंच सविता चौगले यांनी स्वागत केले तर सरपंच अमित पाटील यांनी प्रास्ताविक केले. विकास पाटील, बी. एम. पाटील, डी. एम. चौगले, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जयश्री पाटील, अश्विनी पाटील, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
कुणाचे लाड करत नाही
मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी जनतेसाठी काम करावे. जनतेला त्रास होईल असे काम करू नये. कागल तालुक्यात आम्ही असले कुणाचे लाड करुन घेत नाही, असे मंत्री मुश्रीफ यांनी बडवे यांना सुनावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.