आयजीएम रुग्णालय
आयजीएम रुग्णालय sakal
कोल्हापूर

इचलकरंजी : आयजीएमचे आरोग्य बिघडलेलेच

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : शिरोळ, हातकणंगले तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयजीएम रुग्णालयात असुविधांची वानवा सुरूच आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटा यशस्वीपणे निभावणाऱ्या आयजीएम रुग्णालयास वेळीच बळकटी मिळणे गरजेचे आहे. शासनाकडे हस्तांतरण झाल्यापासून अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर सुरू असणारी आरोग्य सेवा तोकडी पडत आहे. कुशल तंत्रज्ञ, सुसज्ज साधनांच्या अभावाची झळ रुग्णांना बसत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला वेळीच सशक्त केले; तरच भविष्यात आयजीएमचे आरोग्य नेटकेपणाने जपले जाणार आहे.

* विद्युत सुरक्षा रामभरोसेच

आयजीएम रुग्णालयाचे वेळोवेळी फायर ऑडिट व विद्युत सुरक्षेबाबत उपाययोजना प्रशासनाने आखल्या. मात्र याची अंमलबजावणी करताना जिल्हा प्रशासन कुठेच दिसले नाही. याचा जबर फटका कोरोनात आयजीएम रुग्णालयाला बसला. एकदा नाही तर तब्बल चारवेळा शॉर्टसर्किट होऊन आगीच्या घटना आयजीएममध्ये घडल्या. त्यामुळे वेळीच सुसज्ज फायर ऑडिटसह विद्युत सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांची पूर्तता करणे महत्त्‍वाचे ठरणार आहे.

* रुग्णांची परवड थांबेना

सर्वसामान्य रुग्ण मोठ्या आशेने आयजीएम रुग्णालयात पाय ठेवतात. मात्र रुग्णालयात पाय ठेवल्यापासून उपचार मिळेपर्यंत अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रभावी आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसल्याने उपचारावर मर्यादा येत आहेत. कर्मचारी वर्ग चिमूटभर असल्याने याचा त्रासही रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून अनेकदा रुग्णांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे प्रसंग वारंवार घडताना दिसतात. अशावेळी रुग्णांची परवड थांबवून आरोग्य सेवेची हमी दिली पाहिजे.

* अस्वच्छतेत वाढच

आयजीएममध्ये स्वच्छतेचा प्रश्‍न नेहमी चर्चेचा ठरत असतो. डेंगी, चिकनगुणिया साथीच्या आजारात रुग्णालयातील बरेचसे कर्मचारी या रोगांना बळी पडतात. लिकेज पाईपलाईन, पाण्याचे डबके, रुग्णालय परिसरात वाढलेले तण यामुळे आयजीएममध्ये अस्वच्छता वाढतच आहे. आयजीएम रुग्णालय व परिसर कायम स्वच्छ ठेवून रुग्णांचे व कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपणे गरजेचे आहे.

* लॅब असून गैरसोय

शासनाच्या महालॅब अंतर्गत आयजीएम रुग्णालयात लॅब आहे. मात्र या लॅबमध्ये चाचण्या करण्यासाठी अपुरे मनुष्यबळ आहे. शिवाय चाचण्यांच्या अहवालांसाठी दोन दिवस ताटकळत बसावे लागते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय आणखी वाढतच आहे. रुग्णालयातील लॅबमध्ये सर्व चाचण्यांचा अहवाल मिळण्याची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे.

* मानसोपचारतज्‍ज्ञाची गरज

रुग्णालयात सध्या अनेक तज्‍ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. यामुळे सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचारास मदत होते. मात्र अलीकडे मानसिक आरोग्याचे प्रश्‍न वाढत चालले आहेत. शारीरिक व्याधींबरोबर मानसिक रोगही तितकेच आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्य निकोप राखायचे असेल तर त्यावरील उपचारही महत्त्‍वाचे आहेत. त्यासाठी आता आयजीएम रुग्णालयात मानसोपचार तज्‍ज्ञाची गरज अधोरेखीत होत आहे.

* बाह्य रुग्ण कायम सेवेत

कोरोनाचा संसर्ग सुरू झाला की रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग आपोआप शासन लॉक करते. अशावेळी बाह्य रुग्णांची परवड होत असून उपचारासाठी त्रास वाढतो. त्यामुळे बाह्य रुग्णांनाही योग्य उपचार मिळवून देणे हे शासनाचे काम आहे. येत्या काळात कोरोना असो अथवा कोणतेही आरोग्य संकट अशा काळातही रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग रुग्णांच्या कायम सेवेत ठेवण्याची सुविधा ठळकपणे स्पष्ट होत आहे.

कोरोनामुळे या सुविधा

* ऑक्सिजन निर्मिती (दररोज)- २५ हजार लिटर

* ऑक्सिजन साठवणूक - ६ हजार लिटर

* जंबो सिलिंडर - २००

* व्हेंटिलेटर -२३

* सेमी आयसोलेशन बेड- १०

* आयसीयू बेड-१०

* हायफ्लो मशीन-८

* ऑक्सिजन कॉन्सट्रेटर-६०

----

आरोग्य कर्मचारी

उपलब्ध कर्मचारी -128

असलेली गरज- 220

या सुविधांची केवळ घोषणा

* ३०० बेडचे हॉस्पिटल

* सिटी स्कॅन मशिन

* अत्याधुनिक एक्सरे मशिन

* सुसज्ज अत्याधुनिक लॅब

* शुध्द ऑक्सीजन प्रकल्प

-----------

कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतानाही कोरोनात रूग्णांवर योग्य उपचार करून रूग्णांना बरे केले. सध्या बाह्य रूग्ण कक्षही सुरू झाला असून सर्व प्रकारच्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रूग्णालयाच्या क्षमतेनुसार लागणारी आरोग्य यंत्रणा वेळीच मिळाल्यास सक्षमपणे आरोग्य सेवा रूग्णांपर्यंत पोहचेल.

-डॉ. आर. आर. शेट्टे, वैद्यकीय अधिक्षक, आयजीएम रूग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT