कोल्हापूर

लाॅकडाऊनचा ‘गोकुळ’ला फटका; दोन दिवसांत दीड लाख लिटरने विक्रीत घट

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात शनिवारी (ता. १५) मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका (Kolhapur Lockdown Impact) कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) (Gokul Dudha Sangh)दूध विक्रीला बसला असून, गेल्या दोन दिवसांत रोज सरासरी दीड लाख लिटरने दूध विक्रीत घट झाली आहे. जिल्ह्यातील संकलन मात्र सुरळीत सुरू असले तरी कोल्हापूरसह सांगली, पुणे, मुंबईतही (Sangli,Pune,Mumbai)असलेल्या लॉकडाउनचा फटका ‘गोकुळ’ च्या दूध विक्रीला बसला आहे.

Kolhapur Lockdown impact Gokul milk sales fell by 1.5 lakh litres kolhapur news

‘गोकुळ’ चे दोन्हीवेळचे मिळून दैनंदिन संकलन सुमारे साडेबारा ते १३ लाख लिटर आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे लॉकडाउन असला तरी संकलनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. याशिवाय संघाकडून कर्नाटकसह इतर जिल्ह्यातूनही दूध खरेदी केले जाते. संकलित दुधावर प्रक्रिया करून हे दूध पुणे, मुंबईसह कोकणाता विक्रीसाठी पाठवले जाते. ‘गोकुळ’ दैनदिन दूध विक्री सुमारे १२ लाख ७० हजार लिटर आहे. यापैकी दोन ते अडीच लाख लिटर दूध जिल्ह्यात विकले जाते. उर्वरित दुधाच्या बाजारपेठेसाठी संघाला पुणे, मुंबईवर अवलंबून रहावे लागते. गेल्या दोन दिवसांत ही विक्री दहा ते साडेदहा लिटरवर आली आहे.

काल तर चक्रीवादळाच्या परिणामुळे एकट्या मुंबईत याशिवाय ५० हजार अतिरिक्त दुधाची विक्री थांबली. संकलन व विक्रीतून शिल्लक रहाणाऱ्या दुधापासून उपपदार्थ बनवण्यावर भर दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा इशारा: भारतीय नौदल फक्त समुद्राचे नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षेचे मुख्य आधार आहे

Nashik News : नाशिकमध्ये ३९१ गणेश मंडळांना पोलिसांची परवानगी; महापालिकेकडून ४५५ मंडळांना ग्रीन सिग्नल

Saurabh Bhardwaj: भारद्वाज यांच्या निवासस्थानी छापे; बांधकाम गैरव्यवहारप्रकरणी ईडीची कारवाई, ‘आप’कडून टीकास्त्र

Nashik Ganeshotsav 2025 : नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनाचा उत्साह शिगेला, बाजारपेठा गजबजल्या

R Ashwin Retirement: IPL निवृत्तीनंतर काय करणार अश्विन? परदेशात खेळायचे असेल, तर BCCI चा नियम काय?

SCROLL FOR NEXT