kolhapur municipal corporation mayor nilofar ajrekar relies press not to sambhaji raje chatrapati 
कोल्हापूर

'छत्रपती घराणे आमची अस्मिता ; खासदार संभाजीराजेंना दुखावण्याचा हेतू नव्हता'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - खासदार संभाजीराजे यांना दुखावण्याचा अथवा राजकारण करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्टीकरण महापौर निलोफर आजरेकर यांनी दिले आहे. मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने कालची सर्वसाधारण सभा तहकूब झाली. शासनाला जबाबदार धरून तसेच केंद्र सरकारचा निषेध करून आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला. 

खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट नाकारल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेची सभा तहकुब करण्यात आली होती. त्यामुळे याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी एक पत्र पसिद्ध करून महापालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज महापौर आजरेकर यांनी आपली भूमिका मांडत संभाजी राजे यांना दुखावण्याचा अथवा राजकारण करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. 

केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणासंबंधी सहकार्य मिळणे अपेक्षित होते त्याप्रमाणे ते मिळाले नाही. कोल्हापूरचे छत्रपती घराणे हे कोणताही पक्ष जात धर्म, पाहून काम करत नाही. ते केवळ समाजासाठी काम करतात. याची आम्हास कल्पना आहे. यासंबंधी संभाजीराजे छत्रपती व सर्व खासदार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट न दिल्याची बातमी वाचली. त्यामुळे कोल्हापूरवासीयांची अस्मिता दुखावली गेली. त्यातूनच भावना व्यक्त झाली. छत्रपती घराणे शाहूप्रेमी व कोल्हापूरवासीयांचा आदर, श्रद्धा व अस्मितेची बाब आहे. यात संभाजीराजेंना कोणत्याही प्रकारे दुखावण्याचा अथवा राजकारण करण्याचा हेतू नव्हता. देशात आरक्षणाचा पहिला निर्णय तसेच कायदा करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आमचे आदरस्थान असल्याचे आजरेकर म्हणाल्या.

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आदर आहे. संभाजीराजे यांनी मोठ्या प्रयत्नातून शहरासाठी केंद्र सरकारकडून गॅस पाईपलाईनची योजना मंजूर केली. त्याचा आम्हालाही अभिमान आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सभागृहात चर्चा करणे आवश्‍यक आहे. पाईपलाईन योजना ज्या भागातून जाणार आहे तेथील नगरसेवकांशी बैठक घेऊन चर्चा करणार आहोत, अशी माहिती आजरेकर यांनी दिली. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

SCROLL FOR NEXT