Pregnant women sakal
कोल्हापूर

Kolhapur : 'हे' नामांकित हॉस्पिटल अडचणीत; गर्भपाताचा संशय असलेला अहवाल महापालिकेला मिळाला!

सीपीआर व महापालिकेची (Kolhapur Municipal Corporation) इमारत जवळ असतानाही या महिलेच्या गर्भपाताबाबतचा अहवाल देण्यास सीपीआर प्रशासनाला वेळ लागला आहे.

सकाळ डिजिटल टीम

या प्रकरणात गोपनीयतेच्या नावाखाली अनेक बाबी सांगितल्या जात नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील संशय वाढत चालला आहे.

कोल्हापूर : राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलमध्ये (Shree Hospital Rajarampuri) अत्यवस्थ झालेल्या महिलेच्या गर्भपाताबाबतचा अहवाल तब्बल आठ दिवसांनंतर सीपीआरकडून महापालिकेला मिळाला आहे. या प्रकरणात नेमके काय घडले याबाबत संबंधित महिलेचा जबाब घेऊन लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असे महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव यांनी सांगितले.

सीपीआर व महापालिकेची (Kolhapur Municipal Corporation) इमारत जवळ असतानाही या महिलेच्या गर्भपाताबाबतचा अहवाल देण्यास सीपीआर प्रशासनाला वेळ लागला आहे. तसेच या प्रकरणात गोपनीयतेच्या नावाखाली अनेक बाबी सांगितल्या जात नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील संशय वाढत चालला आहे. संबंधित हॉस्पिटलच्या गर्भलिंग निदानाबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

पण, स्टिंग ऑपरेशनवेळी त्या हॉस्पिटलच्या केलेल्या पाहणीत एक महिला अत्यवस्थ आढळून आली होती. रक्तस्राव झाला असल्याने गर्भपाताचा संशय आला. त्यामुळे त्या महिलेला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तेथील तपासणीनंतर अहवाल तयार करण्यात आला. त्यात गर्भपाताचे औषध दिल्याने तिचा अतिरक्तस्राव झाल्याचे नमूद केले होते.

पण, या अहवालानंतर पुढील प्रक्रिया महापालिकेच्या आरोग्य विभागाला करावी लागणार होती. त्यासाठी महापालिका त्या अहवालाची प्रतीक्षा करत होती. काल सीपीआरकडून तो अहवाल पाठवला गेला असे सांगण्यात आले. पण महापालिका प्रशासनाने अहवाल आला नसल्याचे सांगितले. यामुळे या प्रकरणाबाबत संशय बळावत चालला होता.

काल तो अहवाल महापालिकेला मिळाला. त्यातील मुद्द्यांनुसार संबंधित महिलेचा जबाब घेतला जाणार आहे. ती कोठे ॲडमीट होती, कोणते औषध कुणी दिले, याबाबतचा सविस्तर जबाब घेऊन अंतिम अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असे आरोग्याधिकारी डॉ. जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT