कोल्हापूर

केंद्रीय पथकाकडून महापालिकेच्या संजीवनी अभियानाचे कौतुक

संजीवनी अभियान राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे यावेळी समितीने स्पष्ट केले.

डॅनियल काळे

कोल्हापूर : कोरोना महामारीचा (covid-19) फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने गुरुवारी (१५) दुपारी सावित्रीबाई फुले रुग्णालयातील नागरी आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या लसीकरणाची (covid -19 vaccination) माहिती घेतली. सोबत लसीकरण कशा पद्धतीने सुरु आहे याची पाहणी केली. पाहणीनंतर महापालिकेच्या लसीकरण कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान शहराला जास्तीत जास्त व्हॅक्सीन उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी उप-आयुक्त निखील मोरे यांनी केली. या केंद्रीय (central health committee) पथकामध्ये राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, उप-संचालक डॉ. प्रणिल कांबळे, उरोरोग तज्ञ सहा. प्राध्यापक डॉ. सत्यजित साहू, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. हेमंत खरणारे उपस्थितीत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महानगरपालिकेने केलेल्या कामकाजाचे प्रेझेंटेशनद्वारे पथकाला माहिती दिली. महापालिकेने शहरामध्ये राबवलेल्या संजीवनी अभियानते केंद्रीय पथकाने कौतुक केले. महापालिकेने चांगले काम केले असून त्याची राज्यपातळीवर दखल घेतली आहे. संजीवनी अभियान राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे यावेळी समितीने स्पष्ट केले.

दरम्यान दुपारी पथकाने सावित्रीबाई फुले रुग्णालयातील नागरी आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी नागरीकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. उप-आयुक्त निखील मोरे यांनी महापालिकेच्यावतीने लसीकरणावेळी देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. महापालिकेचे लसीकरणाचे काम चांगल्या पध्दतीने सुरु असून याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शहराची दैनदिन 6000 लसीकरण करण्याची क्षमता असल्याचे उप-आयुक्तांनी पथकाला सांगितली. जिल्ह्यासह शहराला व्हॅक्सीन उपलब्ध करुन देण्याच्या विनंतीला पथकाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, उपायुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ फारुख देसाई, आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ रुक्सार मोमीन, लसीकरण नोडल अधिकारी डॉ.अमोलकुमार माने आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT