kolhapur municipal corporator kissed opposition party corporator in meeting 
कोल्हापूर

व्हिडिओ - कहरच; कोल्हापूरमध्ये भाजपा नगरसेवकाने घेतलं काँग्रेस नगरसेवकाचं चुंबन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज वेगळ्याच कारणांनी गाजली. या सभेतील एक विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायलर झाला आणि कोल्हापूरसह राज्यभरात हा चर्चेचा विषय झाला. सभा सुरू असतानाच एका नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाची पप्पी घेतली आणि या घटनेचा व्हिडिओ क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल आला. 

भाजप ताराराणी आघाडीचे टेंबलाईवाडी प्रभागाचे नगरसेवक कमलाकर भोपळे हे स्थायी समिती सदस्य निवडीपासून त्यांच्या आघाडीवर नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी आज सभागृहात दाखविली. सभागृहात बसताना कमलाकर भोपळे हे दोन्ही कॉग्रेसचे नगरसेवक बसतात त्या बाजूच्या बाकावर बसले. तसेच येथे त्यांनी कॉग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांची गळाभेट घेत त्यांचे चुंबनही घेतले. त्यांच्या या कृतीबद्दल सभागृहात उलटसुलट चर्चा सुरु होती. गळाभेट घेणे ठीक आहे, पण चुंबन घेणे हे सभागृहात शोभत नसल्याची टीका अनेक नगरसेवकांनी बोलून दाखविली. यावेळी कमलाकर भोपळे यांनी मला कॉग्रेसनेच जास्त प्रेम दिले आहे. या प्रेमापोटी मला रहावले नाही. त्यामुळे मी गटनेते देशमुख यांची गळाभेट घेऊन त्यांचे चुंबन घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. तर भोपळेंचे तुमच्यावर एवढे प्रेम का असे देशमुख यांना विचारात कॉग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, टेंबलाईवाडी प्रभागातील विकासकामासाठी आपण 75 लाखांचा निधी दिला आहे. तसेच आमदार त्रूतूराज पाटील यांच्या फंडातूनही स्वतंत्र निधी दिला जाणार असल्याने भोपळे खूप असल्याचे सांगीतले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना अमेरिकेतून पाठिंबा

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT