Radhanagari Dam
Radhanagari Dam esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Update : राधानगरी धरण 100 टक्के भरलं; जिल्ह्यात आतापर्यंत 71 बंधारे पाण्याखाली

सकाळ डिजिटल टीम

गेल्या चार दिवसांपासून वरुण राजानं पुन्हा दमदार हजेरी लावलीय.

Kolhapur Rain Update : गेल्या चार दिवसांपासून वरुण राजानं पुन्हा दमदार हजेरी लावलीय. पावसानं उघडीप घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्यानं पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पंचगंगा नदीवरील (Panchganga River) 66 ते 68 बंधारेपाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूटावर असून धोका पातळी 43 फूटावर आहे.

राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजारा, गगनबावडा परिसरात पावसानं थैमान घातलं आहे. परिणामी, राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होऊ लागली असून धरण १०० टक्के भरले असल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत. आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास गेट क्रमांक ६ उघडले असून यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीची वाटचाल धोका पातळीकडे होऊ लागली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालं असून खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळं धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणातून सध्या ३०२८ क्युसेकचा विसर्ग सध्या नदीत सुरू आहे. काल धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून अतिवृष्टी झाल्याने धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे.

दुधगंगा धरणातून 1423 क्युसेक्सनं विसर्ग

दूधगंगा धरणामध्ये (Dudhganga Dam) सांडवा पातळीपर्यंत पाणीसाठा झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरुय. आज दुपारी दोन वाजता दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील 5 वक्राकार उघडले असून त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे, तसेच पाॅवर हाऊस मधून 1000 क्युसेक्स असा एकूण 1423 क्युसेक्सनं विसर्ग सुरूय.

66 बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी (Ichalkaranji), राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, वेदगंगा नदीवरील- वाघापूर, निळपण, शेणगांव, म्हसवे, गारगोटी, कुरणी, बस्तवडे व चिखली, कुंभी नदीवरील- कळे, शेणवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड, भोगावती नदीवरील- हळदी व राशिवडे, वारणा नदीवरील- चिंचोली असे एकूण 66 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळं पंचगंगा नदीने काल रात्री १० च्या सुमारास आपली इशारा पातळी गाठली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी ६ वाजता ३९ फूट ८ इंचावर गेली असून, पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट आहे. पंचगंगा सध्या धोका पातळीकडे वाटचाल करत असून जिल्ह्यात आतापर्यंत ७१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीने आपली इशारा पातळी गाठल्याने यंत्रणाही सतर्क झाले असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसंच दरवर्षी महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावातील गावकऱ्यांना त्वरित सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT