Kolhapur Rain Update Woman Died esakal
कोल्हापूर

Kolhapur : पावसाने भिंत कोसळून राहत्या घरात महिलेचा मृत्यू; मतिमंद रोशन झाला अनाथ, घटनेमुळं पंचक्रोशीत हळहळ

किणे (ता. आजरा) येथे घराची भिंत कोसळून सुनीता अर्जुन गुडूळकर (वय ४५) ठार झाल्या.

सकाळ डिजिटल टीम

सुनीता यांचा मुलगा रोशन मतिमंद आहे. त्यांची मुलगी अश्विनी यांचा विवाह झाला आहे. रोशनच्या भविष्याची चिंता त्यांना सतावत होती.

आजरा : किणे (ता. आजरा) येथे घराची भिंत कोसळून सुनीता अर्जुन गुडूळकर (वय ४५) ठार झाल्या. त्यांचे पती अर्जुन नरसु गुडूळकर (५५) व वत्सला परसु गुडूळकर (५२ ) जखमी झाले आहेत. काल सकाळी सातला ही घटना घडली.

आजरा तालुक्यात (Ajara) पावसाने हा बळी घेतला आहे. येथील प्राथमिक शाळेसमोर अर्जुन गुडूळकर यांचे घर आहे. मागील बाजूला रामा परसु गुडूळकर व वत्सला परसु गुडूळकर यांचे मातीचे घर आहे. मुसळधार पावसात गुडूळकर यांची भिंत भिजली होती. सकाळी वीस फूट उंचीची भिंत अर्जुन गुडूळकर यांच्या घरावर कोसळली.

दरम्यान सुनीता गोठ्याकडे जात होत्या. अर्जुन बाजूला असलेल्या न्हाणीत तोंड धूत होते. अचानक पलीकडच्या घराची भिंत त्यांच्या घरावर कोसळल्यामुळे सुनीता ढिगाऱ्याखाली सापडल्या. अर्जुनदेखील अडकले. आवाजाने नणंद वत्सला बाहेर आल्या.

त्या वेळी विजेचा प्रवाह ओल्या भिंतीत उतरला होता. त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्या जागीच बेशुद्ध पडल्या. शेजारी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वीज प्रवाह बंद करून दोघांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. जखमींना नेसरी ग्रामीण रुग्णालायत हलवण्यात आले.

उपचारापूर्वीच सुनीता यांचा मृत्यू झाला. अर्जुन व वत्सला यांना उपचारानंतर संध्याकाळी घरी पाठवण्यात आले. तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, प्रांत वसुंधरा बारवे यांनी घटनास्थळी भेट दिली. पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सचिव अमित कामत यांनी भेट देऊन गुडूळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

रोशनची हरवली सावली

सुनीता यांचा मुलगा रोशन मतिमंद आहे. त्यांची मुलगी अश्विनी यांचा विवाह झाला आहे. रोशनच्या भविष्याची चिंता त्यांना सतावत होती. गेली २३ वर्षे रोशनचा त्यांनी लाडाने सांभाळ केला होता. कुठेही जाताना त्या रोशनला सोबत घेऊन जात होत्या. त्याची सावलीसारखी सोबत करत होत्या. ही सावलीच हरवल्याने रोशन अनाथ झाला आहे.

भावाच्या रक्षाविसर्जनाला पत्नीचा मृत्यू

अर्जुन यांचे चुलत भाऊ नारायण गुडूळकर यांचे निधन झाले असून, आज रक्षाविसर्जन होते. अर्जुन मुंबई येथे काम करतात. ते बुधवारी सकाळी किणे येथे आले होते. भावाच्या रक्षाविसर्जनादिवशीच पत्नीचा मृत्यू झाल्याने पत्नीचे अंत्यसंस्कार करण्याचे दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली. या घटनेमुळे ग्रामस्थ व किणे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT