kolhapur saurabh whatkar success in upsc exam 
कोल्हापूर

कोणत्याही क्लासशिवाय कोल्हापूरच्या पठ्ठ्याने मिळविले यूपीएससीत लखलखीत यश

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : जवाहर नगर येथील सौरभ विजयकुमार  व्हटकर याने यूपीएससी सिविल सर्विसेसमध्ये संपूर्ण भारतात 695 वा क्रमांक मिळवून कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. स्वतः ऑनलाइन उपलबध्द असणाऱ्या रिसोर्सच्या  माध्यमातून अभ्यास करून सौरभने यशाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे त्याला त्याची आई गीता व्हटकर, मामा डॉ. प्रदीप चंद्रकांत भास्कर आणि संतोष चंद्रकांत भास्कर यांनी प्रोत्साहन दिले. 

आजच यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आणि व्हटकर- भास्कर कुटुंबियांना आनंदाचा पारावार राहिला नाही. 
सौरभ याने  प्राथमिक शिक्षण प्रायव्हेट हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेजमध्ये घेतले. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी. ई . इलेक्ट्रिकल पदवी अभ्यासक्रम पूर्ण केले. तेथून पुढे त्याने केवळ आई आणि मामाचे स्वप्न म्हणून यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत एक्सेल शीटवर त्याने त्याच्या अभ्यासाचे नियोजन केले होते. गेल्या तीन वर्षांमध्ये त्याने व्हाट्सअप फेसबुक यासह इतर कोणतीही सोशल मीडियाची अकाउंट उघडली नाहीत. गेल्या तीन वर्षापासून तो कोल्हापुर मामाच्या घरी राहत होता. इतर कोणताही खासगी क्लास त्याने लावला नव्हता. प्रकृतीची काळजी  घेण्यासाठीही त्याने योगा आणि प्राणायाम यावर अधिक भर दिला. तीन वर्षाच्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातली आणि आज जवाहर नगरातील सुधाकर नगर परिसरातील त्यांच्या घरी आनंदाचा पारावार राहिला नाही. सौरभची आई गीता या रिलायन्स मॉलमध्ये कस्टमर रिलेशन मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत तर वडील सोलापुरातील एका बँकेत कॅशियर आहेत. त्याचे मामा डॉ. प्रदीप भास्कर आणि संतोष भास्कर हे दोघेही नोकरी करतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी यशापर्यंत पोहोचल्याची प्रतिक्रिया सौरभने सकाळ'कडे व्यक्त केली.


गेल्या तीन वर्षात सौरभने घरीच राहून ऑनलाइन अभ्यास केला. कोणत्याही शिकवनीशिवाय त्याने हे यश मिळवले आहे. त्यांच्या कुटुंबात कोणीही यूपीएससी-एमपीएससीमध्ये यश मिळविलेले नाही. सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने मी यूपीएससीकडे वळलो असेही सौरभने सांगितले. अभ्यासावर प्रेम करा हा अभ्यास खूप अवघड आहे, असे अजिबात नाही. मात्र, त्याची गोडी लागली पाहिजे असाही संदेश सौरभने इतर विद्यार्थ्यांना दिला आहे. 

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक अशा कोणत्या पदावर तुला संधी मिळेल असे विचारल्यानंतर सौरभने सांगितले की, पदाबाबतची लिस्ट जाहीर करण्यासाठी किमान अडीच तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे, परंतु, तरीही इंडियन फाॅरेन सर्विसमध्ये काम करायला मला आवडते. 

सौरभ एकुलता एक असून आज त्याच्या घरी त्याची आई गीता, आजी श्रीमती शशिकला चंद्रकांत  भास्कर आणि तो होता. निकाल जाहीर झाल्यानंतर आई गीता व्हटकर यांना आनंदाश्रू अनावर झाले. खूप आनंद झाला, त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळाले आणि हे सर्व त्याने कोल्हापुरातून केले. पुणे-मुंबई दिल्लीला जायची  गरज भासत नाही, हे त्याने दाखवून दिले. आज खूप खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया आई गीता व्हटकर यांनी सकाळ'कडे व्यक्त केली.

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat HC: Zoom मीटिंग नाही कोर्ट आहे! शौचालयातू सुनावणीला हजर राहून फसला, कोर्टाने ठोठावली शिक्षा... पोटासह खिसाही रिकामा

Pune Railway Station: पुणे स्थानकावर ‘ब्लॅक बॉक्स’ सारखी यंत्रणा; व्यवस्थापक, चालक यांच्या संभाषणाचे होणार रेकॉर्डिंग

Satara Fraud:'साताऱ्यातील एकाची ४३ लाखांची फसवणूक'; पाच जणांवर गुन्हा दाखल,वाळू ठेका देण्याचे दाखवले आमिष

Ashadhi Wari:'माउलींच्या पालखीचे लोणंदमध्ये स्वागत'; दर्शनासाठी भाविकांची गर्दी; निरोप देताना अनेकांचे पाणावले डोळे

Fauja Singh : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी अपघाती निधन, रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक

SCROLL FOR NEXT