कोल्हापूर

बांद्राई धनगरवाड्यात चक्क घरात घुसला बिबट्या अन्..

सुनील कोंडुसकर

चंदगड : चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगर वाड्यावरील रामू भागू लांबोर यांच्या घरामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास बिबट्या घुसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लांबोर, त्यांची पत्नी, दोन विवाहित मुली व त्यांची चार मुले भीतीने गारठून गेली. मात्र लांबोर यांच्या प्रसंगावधानामुळे बिबट्याला घरात कोंडून ते सर्वजण सुरक्षित बाहेर पडले. घराच्या खिडकीचा आधार घेऊन बिबट्यानेही जंगलात धूम ठोकली.

नेहमीप्रमाणे लांबोर कुटुंबीयांनी रात्री नऊच्या सुमारास जेवण उरकले. लांबोर यांच्या पत्नीने झोपण्यापूर्वी परसदारी कुत्र्याला खायला दिले. ती आत येत असतानाच मागून कुत्रे पळत घरात आले. त्याच्यापाठोपाठ बिबट्या सुद्धा होता. शिकारीसाठी कुत्र्यावर दबा धरून बसलेला बिबट्या त्याच्या मागोमाग घरात पोहचला होता. अंथरुणात झोपलेल्या मुलांच्या अंगावरुन उडी मारून बिबट्या कुत्र्याच्या दिशेने झेपावला. मात्र हा प्रसंग लक्षात येताच रामू लांबोर यांनी जोराचा आवाज दिला. त्याबरोबर बिबट्या माळ्यावर चढला तर कुत्रे भीतीने खालीच बसून राहिले.

प्रसंगावधान राखत झोपलेल्या मुलांसह सर्वांना घरातून बाहेर काढले. कुत्रे सुद्धा त्यांच्याबरोबर बाहेर आले. दरवाज्याला बाहेरून कडी लावून ते सर्वजण शेजारच्या घरात जाऊन बसले. अकराच्या सुमारास त्यांनी पाटणे वन विभागाला संपर्क करुन कळवले. त्यांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. कोल्हापूरहून रेस्क्यू टीमला सुद्धा पाचारण करण्यात आले. मात्र खिडकीचा आधार घेऊन बिबट्याने जंगलात धूम ठोकली होती. नशीब बलवत्तर म्हणूनच लांबोर कुटुंबियातील कोणत्याही सदस्याला बिबट्याचा सामना करावा लागला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांच्यावर पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप; 'एसीबी'नेच माहिती लीक केल्याचा तक्रारदाराला संशय

Gold Silver Rate India : शेअर बाजार ओपन होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जानेवारी २०२७ पर्यंत सोने एक लाखांच्या आत येणार?

IPL 2027 Auction Player Register List: १२२० खेळाडूंनी नोंदवली नावं... त्यात १२ बांगलादेशी; भारताचे दोनच खेळाडू २ कोटींच्या यादीत, कोण आहे ते?

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, ६ प्रवासी जखमी

Farmer ID Registration : शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी नसेल तर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? मोबाईलवरून असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT