lockdown loose in kolhapur city say collector 
कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये उद्यापासून 'हे' सुरू राहणार, 'हे'  बंद राहणार

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात उद्यापासून (ता. 4) शहरी व ग्रामीण भागातील सर्व उद्योग, सर्व कृषी व फलोत्पादन अंतर्गत येणारे घटक, माल व मालवाहतूक, मद्य विक्री दुकाने, शहरातील बांधकाम, उद्योग, व्यापार, व्यवसाय सुरु केले जातील. तर, शाळा, चित्रपटगृहे, शैक्षणिक संस्था, मंदिर, मश्‍चित तसेच प्रार्थनास्थळे पुढील आदेश निघेपर्यंत बंद ठेवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. त्यामुळे गेली चाळीस दिवसापासून घरात राहिलेल्यांना दिलासा मिळणार आहे. 

दरम्यान, लॉकउाऊन जरी शिथिल केले असले तरीही एकमेकांमधील सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क बांधणे, अनावश्‍यक गर्दीवर निर्बंध कायम ठेवले आहे. याचा भंग करणाऱ्यांवर पूर्वीप्रमाणेच कारवाई केली जाणार आहे. 
राज्य शासनाने 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. दरम्यान, ग्रीन, ऑरेंज आणि रेड असे तीन झोन जाहीर केले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आहे. त्यामुळे, पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये असणाऱ्या नियम अटींना काही प्रमाणात सवलत दिली आहे. दरम्यान, सोशल डिस्टंसिंग पाळणे, अनावश्‍यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. 

 कोल्हापूरमध्ये हे सुरु राहणार

ऑनलाईन, इ-लर्निग शिक्षण, वैद्यकीय कारणास्तव डॉक्‍टरांकडे जाण्याची मुभा देण्यात आली आहे. एक वाहनचालक व दोन प्रवाशांसह टॅक्‍सी व कॅब यांना परवानगी देण्यात येईल. चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालकाशिवाय केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करण्याची मुभा असेल. ग्रामीण भागातील सर्व उद्योग सुरु राहतील. याबाबतील कामगारांचा निवास व समर्पित वाहनाची अट शिथिल करण्यात आली आहे. तर शहरी भागातील उद्योगांसाठी ही कामगारांच्या निवासाची अट शिथिल केली असून समर्पित वाहनाची अट ऐच्छिक केली आहे. शहरी व ग्रामीण भागातील बांधकामे, शहरी भागातील एकाकी दुकाने, संकुलाजवळील तसेच निवासी संकुलातील दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. आवश्‍यक आणि अनावश्‍यक असा कोणताही भेद न करता एका रांगेत/रोडमध्ये (लेनमध्ये) पाच पेक्षा जास्त दुकाने खुली असू नयेत. जर एखाद्या लेनमध्ये/ रोडवर पाचपेक्षा जास्त दुकाने असतील तर जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने खुली राहतील. ग्रामीण भागातील मॉल वगळता सर्व दुकाने आवश्‍यक व अनावश्‍यक भेद न करता खुले ठेवण्याची परवानगी आहे. सर्व बाबतील सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे. कॉमर्स उपक्रमांना केवळ जीवनावश्‍यक वस्तू, औषध, वैद्यकीय उपकरणे, सीटीओ आदी विक्री करण्यासंदर्भात परवानगी असेल. 

हे बंद राहणार

जिल्ह्यातील सर्व सिमा, अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व बंद, अत्यावश्‍यक सेवाही सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंद, दोन जिल्ह्यातील व्यक्ती व वाहनांची हालचाल, परवानगी दिलेल्यांना वगळून बंद राहतील. ऑटो रिक्षा, सहा असनी रिक्षा, सर्व प्रकारच्या टॅक्‍सी सेवा, विशेष परवानगी दिलेली वाहणे वगळून इतर वाहने बंद, शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, विविध क्‍लासेस, सर्व सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडासंकुल, जलतरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम, हॉल, सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम,सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांना बंदी. धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावर बंदी. सर्व क्षेत्रात वर्षावरील नागरिकांना आजारी व्यक्तींना, गर्भवती महिला, 10 वर्षाच्या आतील मुले यांना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून फिरण्यावर बंदी.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT