loksabha election Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

Loksabha Election : लोकसभेसाठी 'हा' उमेदवार डोळ्यासमोर ठेवूनंच आमचं काम सुरू; मुश्रीफांनी कोणाचं घेतलं नाव?

‘यापूर्वी धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) या विभागाचे खासदार होते. आता संजय मंडलिक आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

गडहिंग्लज : ‘यापूर्वी धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) या विभागाचे खासदार होते. आता संजय मंडलिक आहेत. सुरुवातीला अडीच वर्षांत त्यांना निधी मिळण्यात अडचणी आल्या. परंतु, युती शासनाच्या काळात मोठा निधी आणला. त्यात गडहिंग्लज (Gadhinglaj) शहराला झुकते माप दिले. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कोणाची ठरली नसली तरी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून मंडलिकच डोळ्यासमोर ठेवून आमचे काम सुरू आहे’, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केले.

गडहिंग्लज शहरातील सुधारित नळ पाणी योजनेसह ५५ कोटींच्या विविध विकासकामांचा प्रारंभ व शहरातील ५२८ बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वितरणप्रसंगी ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik), धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, पाणी योजना प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांची रथामध्ये बसवून हजारो महिलांच्या उपस्थितीत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

खासदार मंडलिक म्हणाले, ‘काही तांत्रिक कारणाने गडहिंग्लजची पाणी योजना पुढे गेली होती. मी व मुश्रीफ यांनी पाठपुरावा करून योजना कार्यान्वित करण्यात यश आले. जनतेच्या गरजांनुसार विकासाची दिशा ठरवली. निवडणुका येतील व जातील. परंतु, विकासाच्या संकल्पना पूर्ण करण्याच्या आमचा नेहमीच प्रयत्न राहील. येत्या निवडणुकीत जनतेने महायुतीच्या मागे राहावे.’

खासदार महाडिक म्हणाले, ‘काँग्रेस प्रत्येक निवडणुकीत मूलभूत सुविधांची एकच घोषणा देत असे. पण त्यांनी त्या कधीच पूर्ण केल्या नाहीत. पंतप्रधान मोदींनी मात्र दहा वर्षांत जनतेच्या गरजा ओळखून त्यांचे सर्व प्रश्न सोडविले. अशक्य त्या विकासाच्या संकल्पना मोदींनी दशकभरात पूर्ण केल्या. विशेष करून महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांचा भर राहिला.’

यावेळी किरण कदम, सिद्धार्थ बन्ने, महेश सलवादे यांची भाषणे झाली. रामगोंडा गुंडू पाटील यांनी स्वागत केले. प्रा. सुभाष कोरे यांनी सूत्रसंचालन केले. रश्मीराज देसाई यांनी आभार मानले. यावेळी सतीश पाटील, प्रकाश चव्हाण, वसंत यमगेकर, संग्राम कुपेकर, अमर मांगले, नरेंद्र भद्रापूर, प्रकाश पताडे, संतोष कांबळे, उदय परीट आदी उपस्थित होते.

मलाही सोबत नेल्यास...

‘मी व मंडलिक दोघेही गडहिंग्लजच्या बाहेरून पर्यायी मार्ग व रिंग रोडसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून निधी आणू’, अशी ग्वाही महाडिक यांनी दिली. त्यानंतर मुश्रीफ यांनी याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. मुश्रीफ म्हणाले, ‘माझेही गडकरींसोबत चांगले संबंध आहेत. मी दिल्लीत जाऊन त्यांच्याकडून महामार्ग मंजूर करून आणला आहे. त्यांच्याकडे जाताना मलाही सोबत नेले तर आमच्या चांगल्या संबंधाची मदत होईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT