man suicide in kolhapur kasaba bawada
man suicide in kolhapur kasaba bawada 
कोल्हापूर

कोल्हापुरमध्ये तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

कसबा बावडा (कोल्हापूर) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील हनुमान तलावात एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राज महम्मद दस्तगीर शेख (वय 50, रा. शिंदे गल्ली, कसबा बावडा,) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव आहे. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. शेख यांनी आजारास कंटाळून आत्महत्या केल्याची माहीती घटनास्ळ आणि नातेवाईकानी दिली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास शाहूपुरी पोलिस करत आहेत. 

याबाबत अधिक माहित अशी की, शेख हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. उपचार घेहूनही आजारात सुधारणा होत नसल्याने तेही या आजाराला कंटाळले होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते नैराश्‍येत होते. रोज ते याच उद्यानात बसायला यायचे. काही वेळा तर दिवसभर ते येथेच असायचे अशी माहिती स्थानिकांनी दिली. आजही ते नेहमीप्राणे या उद्यानात आले होते. काही वेळ उद्यानात बसून असलेल्या शेख यांनी साडेआकराच्या सुमारास उद्यानातील हनुमान तलावात उडी घेतली. स्थीनिकांनी तात्काळ या घटनेची माहीती शाहुपुरी पोलिसांना दिली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत शेख यांच्या तोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान, आजाराला कंटाळलेल्या शेख यांनी आजारासह स्वतःलाही संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT