minister hasan mushrif challenge to maharashtra bjp president chandrakant patil 
कोल्हापूर

...तर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात सहभाग घेईन ; ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

सुनील पाटील

कोल्हापूर : कर्नाटक सरकार अलमट्टीची उंची वाढवत आहे. अलमट्टीची उंची वाढवू नये आणि मनगुत्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन करावे. त्यांच्या नेतृत्वाखाली मी स्वत: आंदोलन करण्यास तयार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले. तर, उद्या कोल्हापूरमध्ये येत असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलमट्टीची उंची वाढविण्याला विरोध करावा. तसेच, मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी कनार्टकच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करावे, अशी मागणी श्री मुश्रीफ यांनी केली. 

मुश्रीफ म्हणाले, भाजपने देऊळ उघडण्यासाठी घंटानाद करण्याऐवजी कर्नाटकचे मुख्यमंत्री अलमट्टी धरणची उंची वाढवत आहेत, त्याविरोधात आंदोलन करावे. मी स्वत: आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेंगलोर येथे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करायलाय तयार असल्याचेही श्री मुश्रीफ यांनी सांगितले.

ते म्हणाले, उद्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोल्हापूरमध्ये येत आहे. त्यांनी दोन कामे करावीत, अलमट्टीची उंची वाढविण्याला विरोध करावा आणि दुसरे म्हणजे मनगुत्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करावी, असे आवाहनी श्री मुश्रीफ यांनी यावेळी केले.

संपादन - धनाजी सुर्वे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT