mla prakash abitkar altimeter to Administrative Officer Joint Director of Education 
कोल्हापूर

...'तर कोल्हापुरी हिसका दाखवावा लागेल' 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या कामात टाळाटाळ व हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षण सहसंचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोल्हापुरी हिसका दाखवावा लागेल, असा इशारा देत आमदार प्रकाश आबिटकर यांनी कार्यालयाचा आज पंचनामा केला. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची कामे करणे त्यांचे कर्तव्य असून ते मेहरबानी करत नाहीत, अशी तोफही त्यांनी डागली. शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, विद्यापीठ व महाविद्यालयातील विविध पदांवरील निवृत्त व नियमित कर्मचाऱ्यांच्या तक्रारींना आज बांध फुटला आणि त्यांनी कडाडून टीका केली. 

शुभम शिरहट्टी याने शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांची नियुक्ती चुकीची असल्याचा आरोप केला. त्यावर मिलिंद भोसले यांनी पळसे यांच्याबाबत राज्यपालांना चुकीची माहिती पाठवली गेली असून, राज्यपालांचीही दिशाभूल केल्याचे सांगितले. त्याला तत्कालीन कुलगुरू दोषी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

राधानगरी महाविद्यालयातील प्रा. शरद आमते म्हणाले, ""रीतसर नेमणूक असताना निवृत्ती वेतन दिले गेले नसल्याने कोर्टात याचिका दाखल करावी लागली. माझ्या बाजूने निकाल लागूनही वेतन देण्यात टाळाटाळ झाली. आमदारांनी दोन-तीन वेळा सांगूनही त्याबाबत कार्यवाही झाली नाही. माझे निवृत्तिवेतन सुरू झाले असले तरी मला झालेल्या मानसिक त्रासाचे काय?.'' 
बाळासाहेब सावंत म्हणाले, ""वेतन निश्‍चितीची फाईलची पाच शिक्षण सहसंचालक बदलूनही कार्यवाही झाली नाही. पुन्हा प्रस्ताव कार्यालयाकडे पाठवला. कार्यालयाने फाइलच गहाळ झाल्याचे कळवले. आवक-जावकमध्ये फाइलीची नोंदही करण्यात आली नाही.'' राधानगरी महाविद्यालयाचा कारभार अजब असून, प्राचार्य 2 लाख 41 हजार रूपये वेतन काहीच काम न करता घेत असल्याचा व महाविद्यालयांचे रोस्टर चेक होत नसल्याने पदभरती होत नसल्याची तक्रार करण्यात आली. हंबीर कांबळे यांना निलंबन निर्वाह भत्ता मिळत नसल्याचा आरोप केला. प्रकाश कांबळे यांनी पदोन्नतीबाबत बैठक कधी लावणार, अशी विचारणा केली. 

ऊसाला दर न मिळाल्यास शेतकऱ्याची पोरं हातात दांडकी घेऊन रस्त्यावर येतात. दुर्देवाने सुशिक्षित असूनही तुम्ही अरबी समुद्रातल्या दगडासारखे झाले आहात, असा टोला लगावत आमदार आबिटकर यांनी कोल्हापूरचे शिक्षण सहसंचालक कार्यालय पैसे मिळवून देणारे असल्याची ओळख पुसून काढा, असे आवाहन केले. 

हे पण वाचागॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी  : अनुदान बंद 

प्रशासकीय अधिकारी डी. पी. माने यांच्यासंबंधी तक्रारींचा पाढा वाचण्यात कर्मचारी कमी पडत नव्हते. त्यांच्यावरील तक्रारी पाहून आमदार आबिटकर भडकले. त्यांनी पुणे शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांच्याकडे माने यांची बदली आजच करा, अशी मागणी केली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं

BJP MLA: पाणी प्रश्नावर आवाज उठवला तर BJP आमदाराने थेट पायच तोडले... नेमकं काय घडलं? अजून एकालाही अटक नाही

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Pune News : सदनिकाधारक, भाडेकरूंना मोठा दिलासा; भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांवर अतिरिक्त सेवा शुल्क आकारता येणार नाही

SCROLL FOR NEXT