Raibag Crime News esakal
कोल्हापूर

माता न तू वैरणी! अनैतिक संबंधाची माहिती समजताच आईनं पोटच्या पोराचा केला खून; हैवानी कृत्यानं खळबळ

अनैतिक संबंधाची माहिती मुलाला समजल्याने त्या महिलेने नातेवाइकांच्या मदतीने मुलाचा खून केला होता.

सकाळ डिजिटल टीम

मुलाच्या खूनप्रकरणात आईने आपल्या नात्यातील सातजणांची मदत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.

रायबाग : आईनेच (Mother) मुलाचा खून करून नैसर्गिक मृत्यू भासवल्याचे प्रकरण पोलिसांनी (Raibag Police) उघडकीस आणले. रायबाग पोलिसांनी ही कारवाई केली. अनैतिक संबंधाची माहिती मुलाला समजल्याने त्या महिलेने नातेवाइकांच्या मदतीने मुलाचा खून केला होता.

महिन्याभरानंतर हा प्रकार उघडकीस आला. हरिप्रसाद संतोष भोसले (रा. रायबाग) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून सुधा ऊर्फ माधवी संतोष भोसले (रा. रायबाग) असे आईचे नाव आहे. याप्रकरणी तिच्यासह तिघांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी ः रायबाग येथे संतोष भोसले हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांचे भांड्याचे दुकान आहे. सुधा भोसले हिचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मुलगा हरिप्रसादला समजली होती. त्यामुळे सुधाने त्याला जीवे मारण्याचा कट रचला.

त्यासाठी वैशाली सुनील माने (रा. शिंगणापूर, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर), गौतम सुनील माने यांची मदत घेऊन हरिप्रसादचा २८ मे रोजी खून केला. खून केल्यानंतर मुलगा झोपलेल्या जागेवरून उठत नसल्याचे तिने शेजाऱ्यांना सांगितले. मात्र, हरिप्रसाद अचानक मरण पावल्याचे समजल्याने सर्वांनाच धक्का बसला.

त्याचे वडील संतोष बाहेरगावी गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांनी मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून महिन्याभरातच खुनाचा छडा लावला.

मुलाच्या खूनप्रकरणात आईने आपल्या नात्यातील सातजणांची मदत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यातील तिघांना अटक केली असून, इतर संशयित पसार आहेत. घटनास्थळी गुरुवारी पोलिस अधीक्षक संजीव पाटील यांनी भेट देऊन रायबाग पोलिस पथकाचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT