Dhananjay Mahadik esakal
कोल्हापूर

Dhananjay Mahadik : 'माझा निवडणुकीत घात केला, म्हणून घरातला टीव्ही फोडला नाही; गाव सोडलो नाही', खासदार महाडिकांचा कोणावर रोख?

Gokul Milk Politics : लोकांची कामे करत गेलो. त्यामुळे लोक आमच्यासोबत राहिले. त्यानंतर मी खासदार झालो. अमल महाडिक आमदार झाले. गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला.’

Sandeep Shirguppe

Satej Patil vs Dhananjay Mahadik : ‘राजकारणात कालचक्र असते. २०१९ मध्ये माझा निवडणुकीत घात केला. अमलचा पराभव झाला. गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक येथेही पराभव झाला. पण, आम्ही कधी एकटे पडलो नाही. आम्ही लोकांची कामे करत होतो. त्यामुळे लोक आमच्याशी जोडले गेले. पराभव झाला म्हणून घरातला टीव्ही फोडला नाही. गाव सोडून गेलो नाही,’ अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या विरोधकांना टोला लगावला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘तुमचा पराभव झाल्यावर तुम्ही एकटे पडलात का?’, या प्रश्नावर धनंजय महाडिक म्हणाले, ‘आज मावळलेला दिवस उद्या उगवत असतो. २०१९ साली घात करून मला निवडणुकीत पाडले. अमल महाडिक, सम्राट महाडिक यांचा पराभव झाला. गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँक येथेही पराभव झाला. पण, आम्ही खचलो नाही. आम्ही एकटे पडलो असे कधी म्हटले नाही. लोकांची कामे करत गेलो. त्यामुळे लोक आमच्यासोबत राहिले. त्यानंतर मी खासदार झालो. अमल महाडिक आमदार झाले. गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला.’

‘गोकुळ’च्या घडामोडींवर ते म्हणाले, ‘मी या सर्व घडामोडीत कुठेच नव्हतो. महायुतीचा अध्यक्ष झाल्यावर मी विधान केले होते. महायुतीचा अध्यक्ष झाला याचा आनंद आहे. पण, माझा या घडामोडींशी कोणताही संबंध नाही. आता पुढच्या वर्षी गोकुळची निवडणूक आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी, विरोधक सर्वच जण प्रचार करत आहेत. गाठीभेटी घेत आहेत.’

कार्यकर्त्यांना नाराज न करता पक्षप्रवेश

जिल्ह्यातील भाजपमधील पक्षप्रवेशाबाबत खासदार महाडिक म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षात येण्यासाठी जिल्ह्यात अनेकजण इच्छुक आहेत. पण, आमच्या पक्षात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत गेल्यावेळी विजयी झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. महापालिकेत आमचे ३४ नगरसेवक होते. त्यामुळे मूळच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना नाराज न करता पक्षप्रवेश होतील.’

शतप्रतिशत भाजप

महापालिका निवडणुकीत ताराराणी आघाडी असणार का? यावर खासदार महाडिक म्हणाले, ‘आवश्यकता असल्यास ताराराणी आघाडी ठेवू. मात्र, आम्ही शतप्रतिशत भाजप म्हणूनच निवडणूक लढणार आहोत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT