suicide sakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : नगरच्या प्रेमीयुगलांची कोल्हापुरात आत्महत्या

अंबाबाई मंदीर परिसराती घटना ः ‘एकत्र जगू नाही, पण मरु शकतो’ अशी चिठ्ठी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘एकत्र जगू नाही, पण मरू शकतो’ अशी चिठ्ठी लिहून अहमदनगर जिल्ह्यातील तामसवाडी (ता. नेवासा) येथील एका प्रेमीयुगुलाने कोल्हापूरातील (Kolhapur)श्री अंबाबाई मंदिर (Ambabai Tempal)परिसरातील एका यात्रीनिवासमध्ये (धर्मशाळा) गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकिस आली. राहूल विश्वासराव मच्छे (Rahul Machche)(वय २५), प्रियंका विकास भराडे (२२) (Priyanka Bharade)अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

राहूल मच्छे व प्रियंका भराडे हे एकाच गावचे रहीवासी आहेत. प्रियंकाचे तीन वर्षापूर्वी गावातच एकाशी विवाह झालेला आहे. गेले काही वर्षे दोघांमध्ये प्रेमसंबध होते. ते दोघे ३१ डिसेंबर २०२१ रोजी एस.टी. बसने कोल्हापूरात आले. ते ताराबाई रोडवरील एका यात्रीनिवासमध्ये उतरले. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी रुमचा दरवाजा बंद केला. तो उघडला नसल्याने यात्रीनिवास मालकांना शंका आली. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक संदीप जाधव व उपनिरीक्षक प्रितम पुजारी यांनी संबधीत यात्री निवासला भेट दिली. त्यांनी रुमचा दरवाजा तोडून काढला असता दोघा प्रेमीयुगलांनी फॅनच्या हुकाला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

सायंकाळी उशीरा या दोघांचेही पालक कोल्हापुरात दाखल झाले. पहिल्यांदा तरूणाचे पालक आले, त्यांनी आपल्या मुलाचा मृतदेह ओळखला. या दोघांवर कोल्हापुरातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय दोघांच्याही पालकांनी घेतला.

‘दोघे एकत्र जगू नाही, पण मरु शकतो’

आत्महत्या करण्यापूर्वी प्रियंका हिने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. त्यामध्ये, आम्ही प्रेम करतो, पण प्रेम कोणाला कळले नाही. आम्ही दोघे एकत्र जगू शकत नसलो तरी मरु मात्र शकतो असे लिहीले आहे. ‘गूड बाय २०२२’ असेही चिठ्ठीत शेवटी लिहले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT