Bus Accident Karanjphen esakal
कोल्हापूर

Bus Accident : गर्भवती महिलेच्या उपचारासाठी जाताना आरोग्यसेविकेवर काळाचा घाला; डोक्यावरुन एसटी गेल्याने जागीच ठार

अपघातात (Bus Accident) आरोग्य सेविका एसटी बसच्या चाकाखाली सापडून ठार झाल्या.

सकाळ डिजिटल टीम

शिक्षक असलेल्या पती व दोन मुलांसह त्यांचा सुखाचा संसार सुरू होता; पण आजच्या घटनेने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बाजारभोगाव : करंजफेण (ता. शाहूवाडी) जवळ काल (शुक्रवार) झालेल्या अपघातात (Bus Accident) आरोग्य सेविका एसटी बसच्या चाकाखाली सापडून ठार झाल्या. अपघात सकाळी साडेदहाच्या दरम्यान झाला. स्वरूपा विजय शिंदे (वय ३३, रा. नणुंद्रे, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे.

करंजफेण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या गर्भवतीसाठी त्या गडबडीने तिकडे दुचाकीवरून निघाल्या होत्या. याबाबत शाहूवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : स्वरूपा नांदगाव आरोग्य उपकेंद्रात (Nandgaon Health Sub-Centre) आरोग्य सेविका होत्या. सकाळी करंजफेण प्राथमिक आरोग्य केंद्रात एक गर्भवती दाखल झाली. त्यामुळे स्वरूपा यांना केंद्राकडे येण्याचा निरोप देण्यात आला होता.

त्या नणुंद्रे येथून नांदारी फाट्याजवळ आल्या. तेथून त्या सहकारी आरोग्य सेवक हैबतराव मगदूम यांच्या दुचाकी (एम एच ०९ - जी एच १६८२) वरून करंजफेणकडे निघाल्या होत्या. करंजफेण गावाजवळ धावडा नावाच्या शेताजवळ आल्या; तेव्हा एसटी बस (एम. एच. ०६ एस. ८९५३) करंजफेणहून कोल्हापूरकडे जात होती. त्यावेळी त्यांची दुचाकी घसरली.

दुचाकी चालवत असलेले मगदूम रस्त्याच्या बाहेर फेकले गेले तर मागे बसलेल्या स्वरूपा बसच्या चाकाखाली सापडल्या. बसचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मगदूम किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती परिसरात समजल्यानंतर ग्रामस्थ आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बांबवडे पोलिस ठाण्याचे दीपक चौगले , शिवाजी शिंदे यांनी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. घटनास्थळी नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. स्वरूपा यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

सुखी संसारावर दुःखाचा डोंगर

आरोग्य सेविका स्वरूपा शिंदे यांनी उत्कृष्ट सेवेतून रुग्णांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. त्या कुटुंबासह नवीन बांधलेल्या घरात चार महिन्यांपूर्वी रहायला गेल्या होत्या. शिक्षक असलेल्या पती व दोन मुलांसह त्यांचा सुखाचा संसार सुरू होता; पण आजच्या घटनेने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेल्मेट असते तर...

हैबतराव व स्वरुपा यांनी दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरले नव्हते. हेल्मेट घातले असते, तर कदाचित दुर्घटनेची तीव्रता कमी झाली असती, अशी चर्चा घटनास्थळी होती.

अरुंद रस्त्यामुळे अपघात

अणुस्कूरा फाटा ते माळापुडेदरम्यान रस्ता अरुंद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूपट्ट्या भरलेल्या नसल्याने वारंवार अपघात होतात. हा अपघात रस्ते दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT