Navratri 2023  esakal
कोल्हापूर

Navratri 2023 : चौथी माळ, सिंहावर आरूढ झालेल्या माता कुष्मांडेच्या रूपात करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पूजा

आज चौथ्या माळेला देवीची कुष्मांडा रूपात पूजा बांधण्यात आली

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : देवी ही स्त्रीच. देवी गर्भातून नव्या जीवाला जन्म देते. तशीच माता कुष्मांडेने अंतराळातील ग्रहांना जन्म दिला आहे. जिने ग्रहांची निर्मिती केली अशी सिंहावर आरूढ झालेल्या माता कुष्मांडेच्या रूपात करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पूजा बांधण्यात आली.

नवरात्रोत्सवात देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येते. पहिल्या माळेला देवीची सिंहासनारूढ बैठी पूजा बांधण्यात आलेली. तर, काल तिसऱ्या दिवशी कामाक्षीदेवी रूपात पूजा बांधली होती. आज चौथ्या माळेला देवीची कुष्मांडा रूपात पूजा बांधण्यात आली.

पुराणातील उल्लेखानुसार कुष्मांडा देवीने विश्वाची निर्मिती केली होती. म्हणून, हे देवीचे मूळ स्वरूप आहे. विश्वाची निर्मिती करणार ती मूळ शक्ती आहे. ही देवी सूर्यदेवाच्या आत वास करते. सुर्यदेवांच्या जवळ जाण्याची शक्ती तर देवांमध्येही नाही. पण माता कुष्मांडाचे निवासस्थान हे सुर्यदेवच आहेत.

देवीची कुष्मांडा रूपातील पूजा

कसे आहे देवीचे रूप

आज अंबामातेने लाल रंगाची साडी नेसवली असून तिला आठ हात आहेत. म्हणून तिला अष्टभुजा म्हणतात. देवीच्या सात हातात कमंडल, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृताने भरलेले भांडे, आणि गदा आहेत. आठव्या हातात एक नामजप जपमाळ आहे ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते.

आज अंबामाता सिंहावर आरूढ आहे, तसेच तिचे वास्तव्य अवकाशात सुर्यमालेत आहे. त्यामुळे सुर्यावर बसून अवकाशात भ्रमण करणारी अशी ही आजची पूजा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT