Hasan Mushrif AY Patil esakal
कोल्हापूर

Hasan Mushrif : बिद्री गेली आणि आता जिल्हाध्यक्षपदही गेलं..; मुश्रीफांनी 'या' नेत्याचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी श्री. पाटील हे भाजपसोबत जाणार अशी चर्चा होती.

सकाळ डिजिटल टीम

राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघात के. पी. पाटील विरुध्द ए. वाय.पाटील या मेव्हण्या- पाहुण्यांतील वादाची मोठी किनार आहे.

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा कारखान्याच्या निवडणुकीत (Bidri Factory Election) सत्ताधाऱ्यांची विनवणी डावलून विरोधी आघाडीसोबत जाताना पक्षातील ताकदवान नेते व पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याशी घेतलेला पंगाच राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील (A. Y. Patil) यांना भोवल्याचे बोलले जाते. त्यातूनच त्यांची जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी श्री. पाटील हे भाजपसोबत जाणार अशी चर्चा होती. भाजपचे जिल्ह्यातील नेते माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी असलेल्या नातेसंबंधातून ही चर्चा सुरू होती. आजच्या घडामोडीला या चर्चेचीही किनार असल्याचे बोलले जाते.

राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघात के. पी. पाटील विरुध्द ए. वाय.पाटील या मेव्हण्या- पाहुण्यांतील वादाची मोठी किनार आहे. ए. वाय. यांचीही विधानसभा लढवण्याची इच्छा लपून राहिली नव्हती. विशेषतः २०१९ च्या निवडणुकीत पराभूत के. पी. यांना उमेदवारी देण्यापेक्षा मला उमेदवारी द्या असा होरा त्यांनी लावला होता. पण, पक्ष नेतृत्वाने त्यांना विधान परिषदेचा शब्द देऊन शांत केले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांचे विधान परिषदेचेही स्वप्न भंगले. तेव्हापासून ए. वाय. नाराज होते. ते संधीची वाट पाहत होते.

`बिद्री’ च्या निमित्ताने त्यांना ही संधी मिळाली. एक तर विधानसभा द्या किंवा आमदारकीला मला संधी द्या, ही त्यांची मागणी होती. पण, त्याला के. पी. यांच्यासह मुश्रीफांचा विरोध होता. ए. वाय. आव्हान उभे करू शकतील ही शक्यता धरून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले. पण, त्यात यश न आल्याने ए. वाय. यांनी विरोधकांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे एकप्रकारे पक्षात थेट मुश्रीफ यांना आव्हान दिल्याचा प्रकार होता. ‘बिद्री’ त मुश्रीफ-के. पी. यांच्या गटाने एकतर्फी विजय मिळवल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील ए. वाय. यांची ताकदही स्पष्ट झाली.

ए. वाय.काय करणार?

पक्षाने ए. वाय. यांची प्रदेश सचिव पदावर वर्णी लावली असली तरी ते खूष आहेत, असे म्हणता येणार नाहीत. अलीकडेच पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना स्वतंत्र वाहन देण्याचा निर्णय घेतला. त्यालाही ए. वाय. पाटील मुकले. आगामी राजकारणात ए. वाय. काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT