N D Patil esakal
कोल्हापूर

एन. डी. पाटील यांना अखेरचा लाल सलाम; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बावड्यातील रस्त्यांवर त्यांच्या श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : लाल सलाम, लाल सलाम एन. डी. पाटील लाल सलाम, एन. डी. पाटील (N.D.Patil)अमर रहे, अशा घोषणांत ज्येष्ठ कामगार नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील आज अनंतात विलीन झाले. कसबा बावड्यातील (Kasba Bavda) स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर दुपारी दीड वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सुहास व प्रशांत यांनी अग्नी दिला.

राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात सकाळी आठ वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय नेते, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ लावली. दुपारी एकच्या सुमारास त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बावड्यातील स्मशानभूमीत आणण्यात आले. बावड्यातील रस्त्यांवर त्यांच्या श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बावड्यातील नागरिक रस्त्याच्या दुतर्फा थांबून होते.

स्मशानभूमीत सर्व मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर मुलगा सुहास व प्रशांत यांनी भडाग्नी दिला. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी स्मशानभूमीत गर्दी केली. ग्रामीण भागातील आलेल्या ग्रामस्थ आणि त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सतेज पाटील, राज्य मंत्री विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT