new world of gadgets is now a cliwsck away research by tejas koli innovation kolhapur marathi news 
कोल्हापूर

'गॅझेट्‌स'ची नवी दुनिया आता एका क्‍लिकवर कोल्हापूरच्या तेजसचे इनोव्हेशन

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : तेजस मनोहर कोळी (वय 25), शिक्षण इंजिनिअरिंग इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन, रा. लाईन बझार, कसबा बावडा ही ओळख सांगण्याचे कारण म्हणजे या तरुणाने "गॅझेट्‌स'च्या दुनियेतील नवीन काय हे ग्राहकांना सांगण्याचा व्यवसाय (स्टार्टअप) सुरू केला आहे. त्याने स्वतःचे "यू ट्यूब' चॅनेल सुरू केले आहे. आज नवीन काय "लॉन्च' झाले आहे, याची माहिती त्याच्या चॅनेलवर मिळते. काही ग्राहक नवीन इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याच्या चॅनेलला भेट देतात, असे तेजस सांगतो. 

रोज नवीन गॅझेट्‌स बाजारात येतात. मोबाईल असो किंवा इतर इलेक्‍ट्रॉनिक वस्तू असो त्या सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोचण्यास काही कालावधी जातो. आज देशात रोज नवीन हॅण्डसेट बाजारात उपलब्ध होत आहे. त्याची माहिती सर्वांना एका क्‍लिकवर मिळण्यासाठी तेजसने शक्कल लावली. त्याने स्वतःचे यू ट्यूब चॅनेल सुरू केले. चॅनेलवर तो रोज नवीन गॅझेट्‌ची माहिती देतो. कोणते उत्पादन चांगले आहे, कोणत्या नवीन गोष्टी आहेत, त्याचा वापर ग्राहकांना कसा होऊ शकतो याचीही माहिती सांगतो. त्या उत्पादनाबद्दल असलेल्या ग्राहकांच्या शंकाही तो दूर करतो. 

तेजसच्या म्हणण्यानुसार देशात 365 दिवसांत 365 हून अधिक इलेक्‍ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. त्यापैकी काहींचेच मार्केटिंग जोरात होते. उर्वरित उत्पादने चांगली असूनही ती ग्राहकांपर्यंत पोचत नाहीत. एखाद्या दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्यावर ज्यात अधिक कमिशन मिळते, ती वस्तू ग्राहकांच्या गळ्यात मारण्याचे प्रकार होतात. म्हणूनच मार्केटचा अभ्यास ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी त्याने स्वतःचे "टेक्‍नो सोव्हीया' चॅनेल सुरू केले आहे. "सोव्हीया' म्हणजे "कलेक्‍शन ऑफ टेक्‍निकल थिंग्ज्‌'. नावातच चॅनेलचा अर्थ आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या संकेतस्थळांवरून तसेच मार्केटचा अभ्यास करून गॅझेटची माहिती चॅनेलवर देतो. ग्राहकांसाठी हे चॅनेल मार्गदर्शक ठरत आहे. 

दोन डॉक्‍टरांचे यू ट्यूब चॅनेलही 
भारती विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून तेजसने पदवी घेतली आहे. त्याने सहा महिन्यांपूर्वीच सुरू केलेल्या ग्राहकांच्या या मार्गदर्शकाला प्रतिसाद मिळत आहे. दोन डॉक्‍टरांचे यू ट्यूब चॅनेल तो स्वतः चालवितो. त्यांच्याकडून मासिक शुल्क घेऊन तो त्यांना "प्रमोट' करण्याचा प्रयत्न करतो. तेजसचे वडील सहायक पोलिस निरीक्षक आहेत. त्याला पहिल्यापासूनच इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची आवड असल्याने त्याने यात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT