Night landing in Kolhapur in three months 
कोल्हापूर

तीन महिन्यांत कोल्हापुरात नाईट लँडिंग....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - तीन महिन्यांत नाईट लँडिंग सुरू होईल, त्यासाठी दिल्ली दरबारी वजन वापरू, अशी ग्वाही प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या दोन्ही खासदारांनी आज कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत दिली. २०२० डिसेंबर अखेर विमानतळातील अंतर्गत कामे, तर मार्च २०२१ मध्ये प्रवासी आणि प्रशासनासाठीची इमारत तयार होईल, असा विश्‍वास विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले. यानंतर सल्लागार समितीने विमानतळाची पाहणी केली. कोल्हापूर विमानतळाची पहिलीच सल्लागार समितीची बैठक विमानतळावर झाली. समितीचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक  यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 

एकूण ८१४ एकरचा हा प्रकल्प आहे

खासदार धैर्यशील माने आणि समिती सदस्यांसमोर विमानतळाची सध्यस्थिती आणि आगामी उपक्रमांबाबत संचालक कटारिया यांनी माहिती दिली. एकूण ८१४ एकरचा हा प्रकल्प आहे. त्यापैकी ७५० एकर जमीनीचे संपादन झाले आहे. उर्वरीत ६४ एकर संपादित करण्याची गरज असल्याचे कटारिया यांनी स्पष्ट केले. सध्या एकूण दहा विमानांच्या उड्डाणातून सुमारे सातशे प्रवाशी रोज विमानतळाचा वापर करीत असून एअरबससह अन्य सुविधा येथे उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. नाईट लॅण्डींगसाठी सध्या आवश्‍यक यंत्रणा बसविली आहे. मात्र त्याचे ॲप्रुव्हल (मान्यता) भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) कडून येणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय त्याचा वापर होणार नसल्याचेही कटारिया यांनी स्पष्ट केले. यावेळी दोन्ही खासदारांनी  यासाठी दिल्ली दरबारी वजन वापरून तीन महिन्यात नाईट लॅण्डींग सुरू होईल, असा विश्‍वास दाखवला. तसेच खासदार संभाजीराजे छत्रपती दिल्लीत असल्यामुळे ते बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी काल नाराजी व्यक्त केली होती. बैठकीत प्रत्येकाला कामे असतात. त्यामुळे  पुढील बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती असतील, त्यांना सोबत घेऊन बैठकीचे नियोजन करावे, असेही खासदार मंडलिक यांनी स्पष्ट केले.

विमानतळ परिसरात सद्धा सुरू असलेल्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर असून ३ हजार ९०० चौरस मीटरचीच इमारत प्रवाशांसाठी होणार आहे. तर दीड हजार चौरस मीटरची इमारत प्रशासनासाठी होत आहे. विमानतळाची अंतर्गत कामे डिसेंबर २०२० पर्यंत इमारत मार्च २०२१पर्यंत पूर्ण होईल असाही विश्‍वास त्यांना दाखवला. विमानतळावर २१ अडथळे होत त्यापैकी इतर अडथळे कामी झाली असून केवळ नऊ अडथळे शिल्लक आहेत. तेही लवकरात लवकर पूर्ण होतील असे चर्चेअंती स्पष्ट झाले.
बैठकीस आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, सहाय्यक संचालक सोनवणे, स्टेशन व्यवस्थापक सर्वश्री विजय घाटगे,विशाल भारगव, रणजित कुमार, विश्‍वास पाटील यांच्यासह सदस्य विक्रांत कदम, तेज घाटगे, अमित हुक्केरीकर, अमर गांधी, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

६४ एकर जमीन देण्याची मागणी

सध्या विमानतळाकडे जाणारा रस्ता दुहेरी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहे.  प्रवाशांसाठी केएमटी बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली. वीज आणि पाणी यासाठी पर्यायी व्यवस्था, वीज कंपनीकडून वीज आणि एमआयडीसीतून पाणी मिळते, याला पर्यायी पाण्याची लाईन देण्याची मागणी पुढे आली. उर्वरित ६४ एकर जमीन महसूल विभागाने प्रयत्न करून तातडीने द्यावी, अशी मागणी झाली.

तीन महिन्यांत नाईट लँडिंग

कोल्हापूर विमानतळावरील कचरा उठावासह अन्य तांत्रिक बाबींचे मुद्दे करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी टिपून घेतले. तातडीने संबंधित व्यक्तींना, अधिकाऱ्यांना याबाबतची उपाय योजना करण्याचे आदेश त्यांनी दिले. कचरा उठावासाठी उजळाईवाडीतील ग्रामपंचायतीची यंत्रणा तात्पुरती दिली आहे. ग्रामपंचायतीच्या कराबाबतचाही मुद्दा नावडकर यांनी विचारात घेतला असून याबाबतच्या तांत्रिक बाबी निकाली काढण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांकडून नोंदी ही घेतल्या.


विमानतळ सल्लागार समिती स्थापन झाल्यापासून बैठक झालेली नव्हती. विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया अमेरिकेला प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. यापूर्वीची ही बैठक रद्द झाली होती. त्यामुळेच आज बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सल्लागार समितीत इतरही मान्यवर आहेत. त्यांच्या वेळेचाही विचार केला पाहिजे. म्हणून बैठक रद्द केली नाही, यात कोणताही राजकीय हेतू नाही, पुढील बैठक खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थित घेण्याची सूचना केली आहे.
- संजय मंडलिक, खासदार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT