not get enough sleep face side effect world sleep day 
कोल्हापूर

World Sleep Day : पुरेशी झोप नाही घेतली तर करावा लागणार या दुष्परिणामाचा सामना....

शिवाजी यादव

कोल्हापूर - दिवस रात्रीच्या 24 तासात किमान सहा ते सात तास झोप झाली नसेल तर त्याचा शारीरीक व मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतो. यातही यातून विवाहित जोडप्यात वंधत्वाची शक्‍यता वाढते. त्यामुळे प्रत्येक विवाहितांच्या आयुष्यात झोपही आवश्‍यक बाब मानली आहे. त्यामुळे झोपेचे महत्व जाणून घेत पुरेशी झोप घेणे अत्यावश्‍यक आहे. अशी माहिती डॉ. इंद्रनील जाधव यांनी केलेल्या पहाणीतून पुढे आली आहे.

 डॉ.जाधव यांनी "स्त्री रोग" तज्ञ आहेत. वंधत्व उपचार सेवेत अनेक स्त्री पुरूष यांच्या आरोग्य समस्या जाणून घेताना झोप विचलीत झाल्याने संतती विषयी निर्माण होणाऱ्या समस्यांचा त्यांनी अभ्यास केला आहे. त्यातून विविध निरीक्षणे व अभ्यासातून त्यांनी काढलेले निष्कर्ष राष्ट्रीय कार्यशाळातून चर्चेत येत आहेत. त्याची माहिती इंद्रा आयव्हीएफ हॉस्पीटलच्या सहयोगाने प्रसारीत केली जात आहेत. 

कमी झोपेचे असे होतात परिणाम

यातील काही निरीक्षणे अशी की, पुरेशी झोप घेतल्याने आरोग्य तंदुरस्त रहाण्यास मदत होते. त्यातून लैंगिंक प्रभाव वाढीसही मदत होते. सहा तास ते आठ तासाच्या कालावधीत झोप नियमित घेतली जात असेल तर पुरूष व स्त्री जोडीदारांचे आरोग्य तंदूरस्त राहून गर्भधारणाची शक्‍यता वाढीस लागते. तर या उलट झोप सहा तासा पेक्षा कमी व किंवा नऊ तासा पेक्षा जास्त घेतली जात असेल तर गर्भधारणाची शक्‍यता 42 टक्‍क्‍यांनी कमी होते. झोपेत वारंवार अडथळा येण्याने शुक्राणुची संख्या 30 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. शरिरातील शुक्राणू निर्मितीची प्रक्रीयाही झोपेशी जोडली गेली आहे. त्यामुळे सहा ते आठ तास नियमीत झोपेमुळे शुक्राणु निर्मितीस बळ मिळू शकते. तसेच त्याची गुणवत्ता वाढीस उपयोगी ठरू शकते. 
अनेकदा तीव्र धुम्रपान, मद्यपान यातून झोपेवरही विपरिणाम होता तर काही वेळा रात्रीच्या झोपेत दहा सेकंदा पेक्षा अधिककाळ श्‍वास थांबतो, अशीही लक्षणे काही व्यक्ती मध्ये दिसतात अशी लक्षणे बळावली तर हृदय विकार किंवा पक्षाघाताचा झटकाही होण्याचा संभव वाढतो. अशा समस्येशी झुंज देणाऱ्या महिलां पुरूष जोडप्यात गर्भधारणाच्या अडचणी उध्दभवू शकतात. 

तर झोपे कमी झाल्याने क्रय शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे कोणत्याही कामात पुरेसे लक्ष न लागणे त्यातून चिडचिड वाढणे असे प्रकार घडतात. त्यामुळे झोपेच्या वेळेचे नियोजन काटेकोर करणे व त्याची अंमलबजावणी करणे हिताचे ठरते. 
वंध्यत्व, निद्रा नाश अशा समस्यांची कारणे शोधण्यासाठी काही वैद्यकीय चाचण्याची आवश्‍यकता असते. या चाचण्या शुक्राणुशी संबधीत आहे, त्यासाठी जोडप्यांची समस्या ओळखे व समजून घेऊन उपचाराची दिशा ठरविण्यास उपयुक्‍त ठरतात. असेही डॉ. जाधव यांची वैद्यकीय निरीक्षणे सांगतात. 
 

आंतरराष्ट्रीय झोप दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने झोपेचे महत्व जाणून घेत तंदुरूस्त आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्‍यक आहे. याबाबत वैद्यकीय तज्ञाकडून आज जागृती करण्यात आली आहे. रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना तसेच त्याच्या नातेवाईकांनाही झोपेबाबत शास्त्रीय माहिती देण्यात आली.

- डॉ. ए. व्ही. पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Snake Discovery: डोळे नसलेल्या सापावर संशोधन; पुण्यातील ‘तस्कर’ सापाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद, डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले!

Pune News: प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! तिकिटावरील मर्यादा रद्द; विमान कंपन्यांनी दर वाढवले, काय आहेत कारणे?

Chhatrapati Sambhajinagar: चार किमी आले, उरले ३५ किलोमीटर!; दुसरा टप्पा सुरू; नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कधी येणार?

Chhatrapati Sambhajinagar: थकबाकीमुळे ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Chhatrapati Sambhajinagar: आठवडाभरात मिळणार शिधापत्रिकेवर केरोसीन; कंपन्यांकडून तालुकानिहाय होणार वाटप

SCROLL FOR NEXT