on the occasion of valentine day A blood donation in kolhapur 
कोल्हापूर

प्रेम करायचे तर रक्तदान करूनच...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - व्हॅलेंटाईन डे आता दोनच दिवसांवर आला असून या प्रेमोत्सवाचा उत्साह आता आणखी वाढू लागला आहे. या आनंदोत्सवाला आज दुपारपासूनच प्रारंभ होणार आहे. जुन्या, अवीट रोमॅंटिक गीतांच्या मैफलींबरोबरच विविध हॉटेल व रिसॉर्टमध्ये अनलिमिटेड फूड, कॅंडल लाईट डिनरवर विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध भेटवस्तूंबरोबरच गारमेंट आणि ज्वेलरी शोरूममध्येही आकर्षक ऑफर जाहीर झाल्या आहेत. 

‘अंनिस’तर्फे जोडीदाराची विवेकी निवडही

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बारा जानेवारीला युवक दिनापासून चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेपर्यंत राज्यभर ‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान’ राबवले जाते. लव्ह आणि ॲरेंज मॅरेज या दोन्ही पध्दतींना एकत्र आणत
व मुलांचा सहभाग घेवून या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे. प्रेम व आकर्षण आणि संसार व सहजीवन यातील फरक लक्षात घेणे, आदी गोष्टींवर संवादशाळा व ऑनलाईन प्रशिक्षणातून संवाद साधला जातो. अभियानाचे यंदाचे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी २६ जिल्ह्यातील पाच हजारांवर तरूणाई या अभियानात सहभागी झाली होती. यंदाच्या अभियानाची सुरवात जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून झाली. तीस जिल्ह्यातील तरूणाईचा त्यात सहभाग असून अभियानाची सांगता शुक्रवारी (ता. १४) शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने न्यू कॉलेज येथे होणार आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, अतुल दिघे, रिना दिघे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. अध्यक्षस्थानी समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील असतील. यावेळी विविध विषयावर परिसंवाद व तरूण व तरूणींच्या मुलाखतीही होणार आहेत. तनुजा व निहाल शिपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभियानाच्या समारोपाचे सत्र होईल. 

० रक्तदान करूनच प्रेम...

‘प्रेम करायचे तर रक्तदान करूनच’ हे ब्रीद घेवून यंदाही राजारामपुरीतील युवा ऑर्गनायझेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. राजारामपुरी जनता बझारसमोरील राजाराम उद्यानात शिबिर होणार असून अधिकाधिक तरूणाईने त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ऑर्गनायझेशनने केले आहे. गेल्या वर्षी साडेसहाशेहून अधिक जणांनी या शिबिरात रक्तदान केले होते. रक्तदानाचे आवाहन करणारे फलक ऑर्गनायझेशनने शहरात सर्वत्र लावले असून यंदा हा आकडा आणखी वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT