one paper are remaining of twelfth class in belgaum 
कोल्हापूर

'या' एका पेपरमुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला..

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - बारावीचा फक्‍त एक पेपर शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. परीक्षा सुरळीतरित्या सुरु असतानाच कोरोनाच्या संकटामुळे इंग्रजी विषयाचा पेपर पुढे ठकलण्यात आला त्यामुळे बारावीची परीक्षा पुर्ण होऊ शकली नाही मात्र यामुळे विद्यार्थ्यांची परवड होत असुन पदवीपुर्व शिक्षण खात्याने पेपरबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाची परीक्षा म्हणुन बारावीच्या परीक्षेकडे पाहीले जाते त्यामुळे बारावीची परीक्षा सुरळीतरित्या पार पडावी अशीच अपेक्षा विद्यार्थी व पालकांमधुन व्यक्‍त होत असते. मात्र कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे इतर पेपर सुरळीत पार पडले असताना 23 मार्चला होणारा इंग्रजी विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला त्यामुळे सर्वच शाखांचे विद्यार्थी अडकले असुन पेपर कधी होणार या संभ्रमावस्थेत सर्व विद्यार्थी आहेत. कारण एका इंग्रजी पेपरमुळे तिन्ही शाखेतील विद्यार्थ्याना पुढील अभ्यासाचे नीट नियोजन करता येत नसल्याचे दिसुन येत आहे.

पदवीपुर्व शिक्षण खात्याने दहावीच्या परीक्षा काळात बारावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र लॉकडाऊन सलग तिसऱ्यांदा वाढविण्यात आल्याने दहावी परीक्षेबरोबरच बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपरही घेणेही शक्‍य होत नाही आहे यामुळे विद्यार्थ्यांची मात्र गोची होत असुन 23 मार्चला शेवटचा पेपर घेतला असता तर अधिक चांगले झाले असते व पेपर तपासणीही सुरु करता आली असती असे मत सर्रास विद्यार्थ्यांमधुन व्यक्‍त होत आहे. तसेच इंग्रजी विषयाच्या पेपरबाबत योग्य तो निर्णय लवकर घ्यावा त्यामुळे विद्यार्थ्यांवरही दडपण येणार नाही अशी मागणी जोर धरु लागली आहे.
 

विज्ञान शाखेतील विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर सीईटी, निटच्या तयारीला निर्धास्तपणे लागतात. मात्र इंग्रजी विषयाचा पेपर न झाल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत असुन परीक्षा पुर्ण न झाल्याने दडपण आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे त्यामुळे शेवटचा पेपर लवकरात लवकर व्हावा व दिशाहीन विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमावर लक्ष केद्रीत करता यावे यासाठी प्रयत्न झाले पाहीजेत
प्रा. अरविंद पाटील, ताराराणी पदवीपुर्व महाविद्यालय, खानापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT