Panhala Farmer WhatsApp Status esakal
कोल्हापूर

Kolhapur : 'मित्रानं फसवलं, आता मला जगायची इच्छाच नाही'; WhatsApp Status ठेवून शेतकरी झाला बेपत्ता

शेती व्यवसायातून त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभारला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गूळ व्यवसाय अडचणीत आल्याने व मित्राने फसवल्याने मी हा निर्णय घेतल्याचे स्टेटस्‌वर लावल्याने खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर : ‘मला जगण्याची इच्छा नाही’, असा स्टेटस्‌ ‌आपल्या मोबाईल व्हॉटसअॅपवर ठेवून पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावातील तरुण शेतकरी (Farmer) गायब झाला. स्टेटस्‌ पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला. पण तो मिळून आला नाही.

गूळ व्यवसाय अडचणीत आल्याने व मित्राने फसवल्याने मी हा निर्णय घेतल्याचे स्टेटस्‌वर लावल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पन्हाळा तालुक्याच्या एका गावातील तरुण शेतकरी नेहमीप्रमाणे आज सकाळी घरातून बाहेर पडला तो थेट मार्केट यार्डमध्ये गेला. तेथे त्याला गुळाला दर नसल्याचे लक्षात आले.

शेती व्यवसायातून त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभारला आहे. त्यात शेतीमालाला भाव नाही, गुळालाही दर येईना. याशिवाय मित्रांनीही घेतलेले पैसे परत न दिल्याने तो नाराज झाला. आज दुपारी त्याने आपले वाहन मार्केट यार्ड भागात उभा केले. तेथेच त्या शेतकऱ्याने ‘ मला जगायचे नाही’ असा स्टेटस आपल्या मोबाईलमधील व्हॉटसअॅपवर ठेवला.

गावातील काहींनी हा स्टेटस्‌ पाहिल्याने साऱ्यांनी त्याच्या घरी धाव घेतली, पण तो मिळाला नाही. या घटनेमुळे त्याचे पत्नी, दोन मुलेही भीतीच्या छायेखाली आहेत. त्याचे मोबाईल लोकेशन हे मार्केट यार्ड दाखवत होते. पण तेथे तो मिळाला नाही. शाहूपुरी पोलिसांनीही याबाबत कोणतीही नोंद नसल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT