कोल्हापूर

शिक्षकांसाठी Good News - बदलीबाबत ग्रामविकास मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत.

- राजेंद्र पाटील

फुलेवाडी : राज्यातील जिल्हा परिषद (zp school) शाळातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या दिवाळीत करण्याचे आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan musheif) यांनी शिक्षक संघाचे शिष्टमंडळास दिले. संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई (mumbai) येथे मुश्रीफ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले.

कोरोना संसर्गामुळे (covid-19) मागील दोन वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. हजारो शिक्षक बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे यावर्षी बदल्या कराव्यात. एका शाळेत तीन वर्ष सेवा पूर्ण झालेला शिक्षक बदलीस पात्र ठरावा अशी या मागणी शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी शिक्षकांच्या बदली सॉफ्टवेअरमध्ये असणाऱ्या काही त्रुटी दुरुस्त झाल्यावर येत्या दिवाळीत बदल्या करू. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाची विशेष मान्यता घेऊन शिक्षकांच्या प्रथम आंतरजिल्हा बदल्या आणि त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पार पाडू असे आश्वासन दिले.

शिष्टमंडळामध्ये राज्य सरचिटणीस केशवराव जाधव, कोल्हापूर जिल्हा संघाचे अध्यक्ष संभाजी बापट, कोल्हापूर शिक्षक बँकेचे चेअरमन आण्णासो शिरगांवे, व्हा. चेअरमन बाजीराव कांबळे, माजी चेअरमन नामदेव रेपे, जी. एस. पाटील, साहेब शेख, शशिकांत अनपट, कृष्णा मुंढे, शिवाजी चवले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

SCROLL FOR NEXT