Private Bus Operators Hit by Toll and Tax Hike; Passengers Pay the Price Amid Poor Road Facilities Sakal
कोल्हापूर

Kolhapur News : महामार्गावर पथकर ढीगभर, सुविधा मात्र कणभर; खासगी आराम बसमालकांचे दुखणे, वाढत्या कराचा भार प्रवाशांच्या माथी

private luxury bus problems : कोल्हापूर-पुणे मार्गावर ठिकठिकाणी रस्ते खोदाई झाली आहे. पथकर भरूनही प्रवासाचा वेळ वाढला आहे. पथकर भरण्यासाठी दोन नाक्यांवर अर्धा तास, महामार्गावरील रस्ते खोदाईमुळे वाहतूक कोंडीत बसचा वेग कमी होतो. त्यात एक ते दीड तास जातो.

Kolhapur Sakal

कोल्हापूर :आराम बस कोल्हापुरातून महामार्गावर पुणे किंवा मुंबई प्रवासासाठी सुटली की वाटेत चार ठिकाणी पथकर (टोल) द्यावा लागतो. तो पाचशे रुपयांच्या घरात जातो. एका आराम बससाठी महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपये पथकर भरावा लागतो. त्या तुलनेत सुविधा मिळत नाहीत. पाच वेगवेगळे कर आराम बसमालकांना भरताना खर्चाचा भाव वाढतो. परिणामी अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करून प्रवाशांच्या माथी मारावी लागत आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाल्यानंतर वाहतूक गतिमान झाली. त्यानंतर गेल्या दीड वर्षापूर्वी तोच महामार्ग खोदून सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर-पुणे मार्गावर ठिकठिकाणी रस्ते खोदाई झाली आहे. पथकर भरूनही प्रवासाचा वेळ वाढला आहे. पथकर भरण्यासाठी दोन नाक्यांवर अर्धा तास, महामार्गावरील रस्ते खोदाईमुळे वाहतूक कोंडीत बसचा वेग कमी होतो. त्यात एक ते दीड तास जातो.

बस चार तासात पुण्यात, तर मुंबईत सहा तासांत पोहोचणे अपेक्षित आहे, त्या बस दीड-दोन तास विलंबाने पोहोचतात. ज्या मार्गासाठी पथकर आकारला जातो, तेथे स्वच्छतागृहाची सुविधा गलिच्छ आहे. त्यामुळे बस खासगी हॉटेलवर थांबवाव्या लागतात. असे असूनही पथकर आकारला जातो.

अनेक ठिकाणी गाडी चालविताना इंधन जास्त जळल्याने खर्च वाढतो. एखादी फेरी कमी होते. प्रवासी संख्या कमी असताना प्रवासी बस न्यावी लागते. कमी प्रवाशांच्या फेरीत नुकसान सोसावे लागते. यात आराम बसला महिन्याकाठी ९३ ते ९५ हजार प्रवासी कर, रस्ते कर भरावा लागतो. याशिवाय बसवाहकांचे वेतन, एजंटांचे कमिशन, वाहतूक पोलिस किंवा परिवहन विभागाकडून होणारी दंडात्मक कारवाई याशिवाय आराम बसचा नियमित खर्च असतो. एका बसला पथकरासाठी महिन्याकाठी दोन ते अडीच लाखांपर्यंत खर्च करावा लागतो. अशा खर्चाच्या ओझ्याखाली दबलेले आराम बसमालक सर्व खर्च काढण्यासाठी किमान नफा मिळवण्यासाठी भाडे वाढ करतात.

यात गर्दीच्या हंगामात नियमित तिकीट भाड्यापेक्षा जवळपास दुप्पट-अडीचपट भाडेही आकारले जाते. बिगर हंगामात कमी प्रवाशांवर वाहतूक करून खर्च तेवढाच करावा लागत असल्याने नफ्यासाठी भाडेवाढ करावी लागते, असा युक्तिवाद आराम बसमालकांकडून केला जातो.


शासन एकाच वाहनाचे विविध कर आकारते. असे कर भरले असतानाही पथकर भरावा लागतो. सर्व कर एकत्र भरून घ्यावेत. त्यासाठी आराम बस प्रवासी वाहतुकीचा अभ्यास करून एकत्रित कराची रक्कम निश्चित करून कर भरून घ्यावा. कर भरायला कोणाचा विरोध नाही, पण प्रवासी कर, रस्ते कर, शिवाय पथकर असे वर्गीकरण करून विविध करांचे ओझे खासगी आराम बस वाहतूकदारांवर लादले जाते. त्यामुळ शासनाने आराम बस वाहतूकदारांना विश्वासात घेऊन एकत्रित कराची रचना करावी.
- सतीश्चंद्र कांबळे, जिल्हाध्यक्ष, खासगी आराम बस वाहतूकदार संघटना

दृष्टिक्षेपात....
- कोल्हापूर-मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या बस ः ४०
- रोजचा पथकर भरणा ः २० हजार
- रोजची एकूण उलाढाल ः १३ ते २० लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपायुक्तच बनल्या मालकीणबाई? मसाज, भांडीकुंडी अन् धमक्या… व्हिडिओ व्हायरल! सफाई कामगार महिलेचे धक्कादायक आरोप

समलैंगिक संबंध, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; CAची आत्महत्या; 22 वर्षीय तरुणीसह दोघांना अटक

शिक्षक मुंबईत! 'आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे हाल; शाळा बंदच्या निर्णयावर ठाम'; राज्य सरकारकडून निघाला नाही तोडगा

मंदिराचा पदाधिकारी चर्चमध्ये प्रार्थनेला जायचा; तिरुपती देवस्थानने केली मोठी कारवाई

PMC Development : रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार; कृती पथकाची निर्मिती; कोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT