Pune Bangalore Highway Chakka Jam Andolan esakal
कोल्हापूर

मोठी बातमी! 'स्वाभिमानी'ला महामार्गावर 'चक्काजाम' करणं भोवलं; राजू शेट्टींसह अडीच हजार शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

या गुन्ह्याबाबत राजू शेट्टी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल (गुरुवार) पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल आठ तासांचे चक्काजाम आंदोलन केले.

Raju Shetti Chakka Jam Andolan : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Bangalore National Highway) शिरोली येथील पुलावर काल (गुरुवार) तब्बल आठ तास केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर (Sugarcane Rate Chakka Jam Andolan) ऊसदराची कोंडी फुटली. मात्र, असे असतानाच आज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासह तब्बल अडीच हजार कार्यकर्त्यांवर कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी तब्बल 8 तास पुणे-बंगळूर महामार्ग रोखल्यामुळे गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोल्हापूर पोलीस दलाच्या शिरोली पोलीस ठाण्यात (Shiroli Police Station) शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस ठाण्यातून नुकतीच देण्यात आली आहे. या गुन्ह्याबाबत राजू शेट्टी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Pune Bangalore Highway Chakka Jam Andolan

'हंगामात प्रतिटन ३१०० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार'

गेल्यावर्षीच्या हंगामामध्ये प्रतिटन ३००० रुपये पेक्षा जास्त दर दिलेल्या साखर कारखान्यांकडून प्रतिटन ५० रुपये, तर त्यापेक्षा कमी दर देणाऱ्यांकडून १०० रुपये दुसरा हप्ता दोन महिन्यांनंतर दिला जाणार आहे. तसेच, यावर्षीच्या गळीत हंगामात प्रतिटन ३१०० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार असल्याचे सांगून चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याची घोषणा काल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती.

Pune Bangalore Highway Chakka Jam Andolan

महामार्गावर तब्बल आठ तासांचे चक्काजाम आंदोलन

सहाशे पोलिसांचा बंदोबस्त आणि पहाटेपासून सुरू असणारी कार्यकर्त्यांची धरपकड झुगारून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल (गुरुवार) पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल आठ तासांचे चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली असली तरीही अवजड वाहनांची कऱ्हाडपर्यंतच्या दुतर्फा रस्त्यांवर रांगाच-रांगा पहायला मिळाल्या. पुणे, मुंबईहून कागल, बेळगावला जाणारे आणि बेळगावहून पुणे मुंबईला जाणाऱ्या वाहतूकदारांचे प्रचंड हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT