rain
rain esakal
कोल्हापूर

15 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पुन्हा पावसाची संततधार

- लुमाकांत नलवडे

शहरासह जिल्हात आजपर्यंत कोणताही अतिवृष्टीचा किंवा पावसाचा अलर्ट नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

कोल्हापूर : गेली पंधरा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा संततधार सुरू केली आहे. (rain update) गेली दोन दिवस उन्हाच्या तडाखा होता; मात्र आज दुपारी बारानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. (kolhapur rain) आज सकाळी ऊन आणि दुपारी पाऊस सुरू झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरासह जिल्हात आजपर्यंत कोणताही अतिवृष्टीचा किंवा पावसाचा अलर्ट नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. (kolhapur rain update)

पावसाळा संपत असताना ही पावसाने रिमझीम सुरूच ठेवली आहे. पाऊस संपला अशी स्थिती शहरात होती, मात्र आज सकाळी ऊन आणि दुपारनंत पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. शहरासह उपनगरात काही ठिकाणी नाले तुंबल्याने रसत्यावर आलेल्या पाण्याने वाहतूक विस्कळीत झाली. पाऊसाच्या काही जोरदार सरींनी शहरात पाणीच पाणी केले. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शहराती गर्दीवर काहीच झाला नसल्याचे दिसून आले.

जोरदार सरीमुळे दुचाकीस्वारांनी मिळेल तेथे आसरा घेवून पुन्हा पुढील प्रवासासाठी जाणे सुरूच ठेवल्यामुळे शहरात गर्दी होती. काही दुकाची स्वारांच्या अंगावर रेनकोटही दिसत नव्हते. सकाळी दहाच्या सुमारास ऊन असल्यामुळे घरातून बाहेर पडताना अनेक वाहनधारकांकडे छत्री किंवा रेनकोट नसल्यामुळे ही स्थिती होती. दरम्यान हवामान विभागाकडून अतिवृष्टी किंवा अधिक पाऊस असा कोणताही अंदाज वर्तवलेला नाही. तरीही जल संपदा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट झाला आहे. घाटमाथ्यांसह दरडी कोसळण्याच्या ठिकाणी दक्षता घेतली जात आहे. हा पाऊस नेहमीच्या तुलनेत नगण्य असल्याचेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT