Rain Update Kolhapur esakal
कोल्हापूर

Rain Update : चिंतेत टाकलेल्या पावसाची रात्रीपासून कोल्हापुरात रिपरिप; दाजीपूर-फेजिवडे रस्त्यावर कोसळली दरड

दाजीपूर- फेजिवडे दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळल्याने काही काळ हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता.

सकाळ डिजिटल टीम

तीन दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज चांगली हजेरी लावली. दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरु असून, मधून-मधून मोठ्या सऱ्या कोसळत आहेत.

कोल्हापूर : जिल्ह्यात अनेक दिवसांपासून उघडीप दिलेल्या आणि चिंतेत टाकलेल्या पावसाची (Rain Update Kolhapur) रात्री रिपरिप सुरू झाली. आजपासून सोमवार (ता. १७) पर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कसबा बावडा येथे पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणी पातळी १४ फूटांपर्यंत खाली आहे. घटप्रभा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, यातून ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. राधानगरी येथील दाजीपूर- फेजिवडे दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळल्याने काही काळ हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता.

जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाने पाठ फिरवला होती. दरम्यान, आज रात्रीपासून रिपरिप सुरू झालेल्या दिलासादायक पावसाने आशा पल्लवीत केली आहे. जिल्ह्यात दमदार आणि मुसळधार पावसाची गरज आहे. त्यानंतर पेरण्यांना पुन्हा गती येईल, अशी परिस्थिती आहे. पाण लोट क्षेत्रात जोराचा पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे.

कोदे धरण पूर्ण क्षमतेने भरले

गगनबावडा : सोमवारपासून गेले तीन दिवस दडी मारलेल्या पावसाने आज दुपारनंतर पुनरागमन केले. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. लखमापूर येथील कुंभी धरणक्षेत्रात गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत २८ मिलिमीटर, तर आजअखेर १४१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरण क्षमतेच्या ४९ टक्के भरले आहे. कोदे लघुप्रकल्पात १९ मिलिमीटर, तर आजअखेर १४३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोदे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणाच्या सांडव्यावरून २६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सरस्वती नदीपात्रात सुरू आहे.

बोरपाडळे परिसराला दिलासा

बोरपाडळे : गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने बोरपाडळेसह शहापूर, मोहरे, माले, काखे, मिठारवाडी , आंबवडे, पोखले आदी गावांमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परिसरातील पिकांची उगवण चांगली झाली असून, सद्य परिस्थिती अतिशय समाधानकारक आहे. पावसाच्या उघडिपीचा काहीसा फायदा शेतकऱ्यांनी कोळपण, भांगलण आदी कामासाठी घेतल्याचे चित्र आहे.

गडहिंग्लजला संततधार

गडहिंग्लज : तीन दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज चांगली हजेरी लावली. दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरु असून, मधून-मधून मोठ्या सऱ्या कोसळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने भात, सोयाबीन, भुईमुगाच्या पेरण्या उरकल्या.

बहुतांश ठिकाणी उगवणही झाली आहे. त्यानंतर पुन्हा तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. दरम्यान, आज दुपारपर्यंत ऊन होते. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला प्रारंभ झाला. रात्रीपर्यंत पावसाची संततधार सुरु होती. यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा

धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा

  • राधानगरी ८.३६ ३.५९

  • तुळशी ३.४७ ०.९७

  • वारणा ३४.३९ १४.३८

  • दूधगंगा २५.३९ ४.३६

  • कासारी २.७७ १.०५

  • कडवी २.५१ १.०५

  • कुंभी २.७१ १.३३

  • पाटगाव ३.७१ १.४०

  • चिकोत्रा १.५२ ०.४५

  • चित्री १.८८ ०.४४

  • जंगमहट्टी १.२२ ०.३५

  • घटप्रभा १.५६ १.४८

  • जांबरे ०.८१ ०.५१

  • आंबेओहोळ १.२४ ०.४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT