ram shinde meet to sambhaji raje chhatrapati 
कोल्हापूर

धनगर आरक्षणासाठीही पाठपुरावा करणार ; खासदार संभाजीराजे छत्रपती  

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - धनगर सामाजाचे आणि छत्रपती घराण्याचे संबंध पूर्वीपासून आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षाणाच्या मागणीला केवळ पाठिंबाच नव्हे तर त्यासाठी आम्ही पाठपुरावाही करणार आहोत. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाची जी व्याख्या केली त्यामध्ये धनगर समाजाचाही समावेश होता. त्यामुळे मराठा समाजा प्रमाणेच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करणे ही आमची जबाबदारी आहे. असे आश्‍वासन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माजी गृहराज्य मंत्री राम शिंदे यांना दिले.

आज धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या गोलमेज परीषदेनंतर शिंदे यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली. 
धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्‍नी आज गोलमेज परिषद झाली. खासदार संभाजीराजे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्यावा यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी गोलमेज परिषदेचा उद्देश, धनगर आरक्षणाचा लढा याबाबत संभाजीराजे यांना माहिती दिली. यावेळी आपली भूमिका मांडताना संभाजीराजे म्हणाले, "कोल्हापुरात गोलमेज परीषद झाली याचा आनंद आहे. या नगरीला रजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा लाभला आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला जे आरक्षण दिले त्यामध्ये एस.सी., एस.टी, ओबीसी, मराठा या समाजांचा समावेश होता.

राजर्षी शाहू महाराजांनी पहिला आंतरजातीय विवाह आपल्या जनकघराण्यातील बहिण चंद्रप्रभा घाटगे यांचा केला. धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी त्यांनी चंद्रप्रभा यांचे लग्न लावून दिले. तेव्हा पासून आमच्या घराण्याची नाळ धनगरसमाजाशी जोडली गेली आहे. धनगर समाजाच्या प्रगतीसाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणे ही छत्रपती घराण्याची जबाबदारी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे तसेच धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही मी प्रयत्न करेन.' 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT