Remedicator injection Available to vendors information Guardian Minister Satej Patil: Discussion with District Chemists Association office bearers 
कोल्हापूर

कोरोनावरील 'हे' महत्वाचे इंजेक्‍शन कोल्हापूरात होणार सर्वत्र उपलब्ध

निवास चौगले

कोल्हापूर : कोव्हिड रुग्णांसाठी जिल्ह्यातील सर्व घाऊक विक्रेत्यांकडे रेमडीसीव्हीर उपलब्ध करुन दिले जाईल. अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. रेमडिसिव्हीर इंजेक्‍शनच्या मागणी प्रमाणे पुरवठा व्हावा. सर्वत्र उपल्बध व्हावे अशी मागणी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनची होती. "एमएससीडीए' चे संघटन सचिव मदन पाटील व जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांची या मागणीसाठी भेट घेतली. 


मागणीच्या प्रमाणात रुग्णांना रेमडीसीव्हीर उपलब्ध करुन दिले जाईल, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या पुरवठा दारांकडून जिल्ह्यातील घाऊक विक्रेत्यांनी आपली मागणी नोंदवून या इंजेक्‍शनची खरेदी करावी. छापील किंमतीनुसार याची विक्री करावी. 

छापील किंमती पेक्षा जादा दराने इंजेक्‍शनची विक्री केल्यास अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त मनीषा जवंजाळ-पाटील (मो.न.9405556424 ) किंवा संजय शेटे यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. 

दरही केले निश्‍चित 
1) Zydus health care Ltd. - Remdac inj. - Rs. 2800/- 
2) Jubilant life Science - Jubi-R inj. -Rs.4700/- 
3) cipla Ltd. -Cipremi inj. - Rs.4000/- 
4) Hetero healthcare - Covifor inj. - 5400/- 


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT