Riot in Kolhapur Municipal Corporation meeting over house tax scam 
कोल्हापूर

घरफाळा घोटाळ्यावरून  कोल्हापूर महापालिका सभेत गदारोळ 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : महापालिकेच्या घरफाळा विभागातील घोटाळ्यावरून आज झालेल्या सभेत गदारोळ झाला. घरफाळा विभागातील 14 प्रकरणांत घोटाळा झाल्याची कबुली प्रशासनाने दिली. घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी विरोधी आघाडीने केली. 
यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ""चौकशी समितीचा अहवाल मिळल्यानंतर दोषींची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करू.'' सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या. 

नगरसेवक भूपाल शेटे यांनी घरफाळा घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ""3 कोटी 18 लाखांच्या घरफाळा नुकसानप्रकरणी चौकशी समितीला करनिर्धारक संजय भोसले यांनी चुकीचा अहवाल दिला आहे. तेच यात दोषी आहेत. अंतिम अहवालातून हे स्पष्ट होत आहे. यात 1 कोटी 85 लाखांच्या नुकसानीस ते स्वत: जबाबदार असून अहवालात याचा समावेश नाही. सर्व मॉलच्या कराराची तपासणी करा, सत्य उघड होईल.'' 
प्रा. जयंत पाटील म्हणाले, ""घरफाळा घोटाळ्याची एकूण 60 प्रकरणे असून 12 प्रकरणांबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण दिले नाही. संबंधितांवर कारवाई करावी. विनाकारण चर्चा होत आहे. यामुळे महापालिकेची बदनामी होत आहे. प्रशासनाने याचा सोक्षमोक्ष लावावा.'' 
सर्व दोषींना निलंबित करून फौजदारी कारवाई करावी. आठ दिवसांत यावर निर्णय झाला नाही तर महापालिकेसमोर उपोषण करू. जर यात टाळाटाळ अगर कोणाला वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा श्री. शेटे यांनी दिला. 
ेअजित ठाणेकर म्हणाले, ""सिस्टीम ऑडिटमध्ये एचसीएल कंपनीवर ताशेरे ओढले आहेत. 2012 पासून घरफाळ्यात घोटाळे झाले आहेत. केवळ 12 नव्हे, तर संपूर्ण घरफाळ्याची चौकशी व्हावी.'' सत्यजित कदम, सदस्य किरण नकाते यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. 

शेटे, पाटील, कदम यांच्यात टोलेबाजी 
घरफाळा घोटाळ्यावरून सदस्य शेटे, सत्यजित कदम आणि प्रा. पाटील यांच्यात टोलेबाजी रंगली. प्रा. पाटील यांनी घोटाळ्याचे प्रकरण समोर आणले; मात्र माध्यमांसमोर गेलो नाही, व्यक्तिदोषातून आम्ही आरोप करत नसल्याचे म्हटले. श्री. कदम म्हणाले, ""दोन वर्षांपूर्वी चार कोटींचा घरफाळा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आणले होते. याबाबत कोणीही चर्चा केली नाही. सर्वच घोटाळ्याबाबत कारवाई झाली पाहिजे.'' यावर सदस्य शेटे यांनी मिळालेल्या माहितीवर आरोप करत आहे, लढा कायम ठेवला आहे, असे सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

Shocking! माथेफिरू तरुणाने चाव्या हिसकावल्या, प्रवाशांनी भरलेली बस सुरू केली अन्...; अनेकांना चिरडले

SCROLL FOR NEXT