Robbery In Kolhapur Phanala Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कुटुंबीयांसह गेले रुग्णालयात तोपर्यत चोरट्यांनी मारला डल्ला...

सकाळ वृत्तसेवा

कोडोली (कोल्हापूर) : जाखले(ता. पन्हाळा) येथे चोरट्याने बंद बंगल्याचे कुलूप तोडून १७ तोळे सोन्याचे दागिने,  ३४ हजारांच्या रोकडसह पावणेचार लाखांची चोरी करून पळ काढला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे चोरी झाल्याची नोंद कोडोली पोलिसांत झाली आहे. खुदबुद्दीन रमजान शिकलगार यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात कोडोली पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.


याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,

शिकलगार हे शनिवारी रात्री सून अलिया हिच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबीयांसह गेले होते. याचा फायदा चोरट्याने घेतला आणि काही वेळातच शिकलगार यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाट फोडून सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने चोरले. यामध्ये दोन मंगळसूत्रे, दोन नेकलेस, दोन चेन, पाच अंगठ्यांसह रोख ३४ हजार असा ३ लाख ७४ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.

 चोरट्याविरोधात कोडोली पोलिसांत गुन्हा नोंद ...
जाखलेच्या पोलिसपाटील उजाला अजित पाटील यांनी कोडोली पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे, फौजदार नरेंद्र पाटील, हवालदार संभाजी पाटील, विनायक पाटील, विजय सोनुले यांसह अन्य कर्मचाऱ्यांनी तपासाला सुरवात केली. कोल्हापूर मुख्यालयातून तातडीने श्‍वान पथक मागवले; मात्र श्‍वान घराजवळील ओढ्यापर्यंतच घुटमळले. यानंतर कपाटावर व साहित्यावर चोरट्याचे ठसेही  घेतले आहेत. अंगुली मुद्राचे सहायक पोलिस निरीक्षक पुणेकर, फौजदार लंडगे यांनी श्‍वान पथकासह तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT