कोल्हापूर

अशोक चव्हाण म्हणजे पिंजऱ्यातील पोपट

ओंकर धर्माधिकारी

कोल्हापूर : अशोक चव्हाणांचा (Ashok Chavan) पक्ष पंधरा वर्षे सत्तेत होता. स्वतः चव्हाण मुख्यमंत्री होते. पण त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही. कारण त्यांचे हात दोरीने बांधले होते आणि दोरीचे टोक दिल्लीतील एका नेत्याच्या हातात होते. सध्या त्यांची अवस्थाही तलाठ्याचा कोतवाल झाल्यासारखी आहे. त्यांना मंत्रीमंडळात फारसे महत्त्व नाही. अशोक चव्हाण म्हणजे पिंजऱ्यातील पोपट आहेत. अशी खोचक टिका माजी राज्य मंत्री सदाभाऊ खोत (Minister of State Sadabhau Khot) यांनी केली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

sadabhau khot criticism on ashok chavan kolhapur political news

खोत म्हणाले,‘तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिलेले आरक्षण उच्च व सर्वोच्च न्यायालयातही टिकले. मात्र राज्यात पांढऱ्या पायाचे महाविकास आघाडीचे सरकार आले आणि मराठा आरक्षण रद्द झाले. कारण राज्य सरकारने योग्य पद्धतीने मराठा समाजाची बाजू मांडली नाही. अशोक चव्हाण त्या उपस्थितीचे अध्यक्ष होते. त्यांनी मराठा आरक्षणाची याचिका न्यायालयात गांर्भियाने हाताळली नाही. त्यामुळेच आज मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. कारण प्रस्थापीत मराठ्यांना सामान्य मराठा जनतेला आरक्षण द्यायचे नाही.

अशोक चव्हाणांच्या पक्षाचे राज्यात १५ वर्षे सरकार होते. केंद्रातही त्यांची सत्ता होती. पण त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कायदा केला नाही. त्यावेळी १०२ व्या घटना दुरुस्तीचाही काही प्रश्न नव्हता. चव्हाण यांचे हात दोरीने बांधले होते. आणि टोक दिल्लीतील एका नेत्याच्या हातात होते. पुढे त्यांच्या आदर्श कारभारामुळे मुख्यमंत्री पद सोडावे लागले. आता त्यांची मंत्रीमंडळातील अवस्था आणखी अवघड आहे.त्यांचा तलाठ्याचा कोतवाल झाला आहे. ते केवळ पिंजऱ्यातील पोपट आहेत. त्यांनी भाजप नेत्यांवर टिका करण्यापेक्षा स्वतः काही तरी केले पाहीजे.‘ या पत्रकार परिषदेला श्रीकांत घाटगे, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिक्केडे यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला

मराठा समाजाच्या आर्थिक विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली गेली. मात्र महाविकास आघाडी सरकारने याची स्वायत्तता संपवली. सामान्य कुटुंबातील हुशार मराठा व्यक्तीची या महामंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी. महामंडळाची व्याप्ती वाढवावी.

तीन मंत्री निष्क्रिय ठरले

कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यूदर अधिक आहेत. जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. मात्र कोणाही सामान्य माणसांसाठी कोवीड सेंटर सुरू केले नाही. वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीपर्यंत पोहचल्या नाहीत. तिन्ही मंत्री निर्ष्किय ठरले आहेत.

sadabhau khot criticism on ashok chavan kolhapur political news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election : जागावाटपाबाबत सर्वच पक्षांचे तळ्यात- मळ्यात; इच्छुकांमध्ये धाकधूक, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले अवघे दोन दिवस

Hugh Morris Passes Away : इंग्लंडच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूचं निधन; ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास...

Stomach Cancer in Young Adults: तरुणांनाही वाढतोय पोटाच्या कर्करोगाचा धोका; चुकीच्या खाण्याचा फटका, रुग्णसंख्या ८ टक्क्यांपर्यंत वाढली

कुत्रा चावल्यानं म्हशीचा मृत्यू, तिच्या दुधापासून बनवलेला रायता; उत्तरकार्यात जेवलेले २०० जण धावले दवाखान्यात

Sangli Raisins : चीनचा बेदाणा अफगाणिस्तानच्या नावावर भारतात; सांगलीत शेकडो टन साठवणुकीचा धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT