कोल्हापूर

मराठा आरक्षण : संभाजीराजे मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

मुंबईतील वर्षा बंगल्यावर सायंकाळी पाच वाजता बैठक होईल

संदीप खांडेकर

कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात (maratha reservation) चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje) उद्या (१७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांची भेट घेणार आहेत. मुंबईतील वर्षा बंगल्यावर सायंकाळी पाच वाजता बैठक होईल. मुख्यमंत्री ठाकरे यांनी भेट घेण्यासंदर्भात संभाजीराजे यांना आमंत्रित केल्याने ते भेटीसाठी जात आहेत.

संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वाखाली कोल्हापुरात (kolhapur) आज मूक आंदोलन झाले. पालकमंत्री सतेज पाटील (sataj patil) व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला उत्सुक असल्याचे सांगत, शासन मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आरक्षणासंदर्भात चर्चा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संभाजीराजे यांनी राज्यभरातील समन्वयकांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल, असे जाहीर केले. त्याचबरोबर सरकारने मागण्या मान्य न केल्यास पुणे ते मुंबई मंत्रालय लॉंग मार्च अटळ असल्याचा इशाराही दिला. या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून संभाजीराजे यांना भेटीचे निमंत्रण आले. संभाजीराजेंनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उद्या भेटीला येत असल्याचे कळविले आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होत असून, बैठकीकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. संभाजीराजे यांनी यापूर्वीच शासनाकडे पाच मागण्या केल्या आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.

प्रमुख मागण्या -

१) मराठा आरक्षणामुळे २०१४ ते पाच मे २०२१ पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्याव्यात

२) ‘ओबीसी‘च्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा

३) 'सारथी' संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 'सारथी' संस्थेची उपकेंद्रे सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तत्काळ सुरू करावा. संस्थेला स्वायत्तता पुन्हा बहाल करावी.

४) अण्णासाहेब पाटील महामंडळाला दोन हजार कोटींचा निधी द्यावा. लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची १० लाख रूपयांची मर्यादा वाढवून ती किमान २५ लाख रूपये करावी.

५) शासनाकडून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. मुंबई, नागपूर, पुणे अशा महानगरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ३००० रूपये व इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २००० रूपये प्रति महिना दिले जातात. ही रक्कम वाढवावी. शासनाकडून मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी सीट्स निर्माण कराव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप...; कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट!

Konkan Railway: मुंबईहून सावंतवाडीला सुटणार विशेष गाड्या; गणेशोत्सवात प्रवाशांना दिलासा

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

Manchar News : मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची आंबेगाव तालुक्यात जय्यत तयारी; तीन हजार समाज बांधव मुंबईत जाणार

Asia Cup 2025: Inshallah! भारतीय संघाला दोन्ही सामन्यांत धुळ चारू; IND vs PAK मॅचपूर्वी हॅरिस रौफचा फाजील आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT