Sanjay Pawar met Uddhav Thackeray in Mumbai esakal
कोल्हापूर

Loksabha Election : 'या' दोन मतदारसंघांवर NCP चा दावा? पवारांनी तात्काळ उद्धव ठाकरेंची मुंबईत घेतली भेट

उपनेतेपदी निवड झाल्यानंतर पवार यांनी काल (बुधवार) मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

आगामी राजकरणासाठी जिल्ह्यातील दोन्ही जागांवर आपले उमेदवार विजयी होणे आवश्‍यक आहे.

कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election) उमेदवार विजयी करायचे आहेत. दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील,’ यासह इतर सूचना माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपनेते संजय पवार (Sanjay Pawar) यांना केल्या.

उपनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी काल (बुधवार) मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आगामी लोकसभेच्या निवडणुकीबाबत ठाकरे यांनी या सूचना केल्या. जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. आपल्यातून ते बाहेर पडले असले तरीही त्या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीत आपलाच अधिकार आहे.

त्यामुळे दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार असतील. आगामी राजकरणासाठी जिल्ह्यातील दोन्ही जागांवर आपले उमेदवार विजयी होणे आवश्‍यक आहे. यासाठी आवश्‍यक ती रणनीती आखणे, उमेदवार विजयी झालेच पाहिजेत यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न करणे, तसेच जिल्ह्यातील इतर घडामोडींबाबत ठाकरे यांनी संजय पवार यांच्याशी चर्चा केली.

दरम्यान, जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असले तरीही दोघेही सध्या शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी शिवसेनेचे (ठाकरे गट) नवीन उमेदवार उभा करण्यासह त्यांना विजयी करण्यापर्यंतची तयारी नव्याने ठाकरे गटाला करावी लागणार आहे. पवार हे जिल्हाप्रमुख असताना त्यांना उपनेतेही केले आहे. त्यामुळे त्यांचीही जबाबदारी आता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT