Health Care esakal
कोल्हापूर

Health Care : ‘एसी’ ची हवा घेताय..! थोडी आरोग्याचीही काळजी घ्या

एसीचा जास्त काळ वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरतोय. सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, जीवनसत्त्व ‘ड’ ची कमतरता जाणवणे, इत्यादी समस्या निर्माण होतात.

सकाळ वृत्तसेवा

Health Care : एखाद्या वातानुकूलित (एसी) रूमध्ये बराच वेळ बसून अचानक बाहेर आल्यानंतर प्रचंड उष्णता जाणवते. त्यामुळे आरोग्याची हानी होण्याची शक्यता अधिक आहे. अशा रूममध्ये अधिक काळ राहिल्यास हाडे, सांधेदुखी, श्‍वसनाचा त्रास आणि त्वचा कोरडी पडणे, जीवनसत्त्व ‘ड’ आदी त्रास होऊ शकतो.

सध्या कोल्हापूरसारख्या शहरात उन्हाचा पारा चाळिशीपार गेला आहे. त्यामुळे पंखे, कुलरच्या तुलनेत वातानुकूलित यंत्राचा वापर वाढला आहे. एसीचा थंडावा हा फायदा आहे, तसे त्याचे तोटेदेखील अनेक आहेत. सातत्याने वापरल्याने शरीरात जीवनसत्त्व ‘डी’ कमी होण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

विशेषतः त्वचेवरील तापमान योग्य न राहिल्यास जीवनसत्त्व ‘डी’ कमी होण्याचा धोका अधिक आहे. त्वचेवर तापमान जास्त असेल तर झपाट्याने शरीर जीवनसत्त्व ‘ड’चे उत्पादन वेगाने करते. मात्र, सातत्याने एसी रूममध्ये बसल्याने तापमान कमी होते. त्यातून ‘ड जीवनसत्त्वाची कमतरता भासू शकते. यासह आरोग्याच्या अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे जास्त काळ न थांबता जास्तीत जास्त नैसर्गिक थंडाव्याचा आधार घ्यावा; अन्यथा आरोग्याच्या दृष्टीने ‘एसी’त राहण्याची मजा सजा ठरू शकते.

‘एसी’चे दुष्परिणाम

सातत्याने एसीत बसल्याने त्वचा कोरडी पडणे, जास्त काळ झोपल्यानंतर त्वचेवरील ओलावा शोषल्याने त्वचा कोरडी पडते. त्वचेवरील चमक कमी होते. त्वचा निर्जीव होऊ शकते.

अंगदुखी वाढू शकते. जास्त काळ झोपल्याने शरीरात वेदना होतात. रात्रभर झोपल्यास कंबरदुखी, डोकेदुखी, हाडे ठिसूळ होणे अशा समस्यांमुळे तब्येत बिघडू शकते. सातत्याने बसल्याने खूप थंडी जाणवते. त्यातून सर्दी होण्याची शक्यता अधिक असते. सर्दी, ताप अशा समस्यांना कायम सामोरे जावे लागते.

एसीचा अतिवापर टाळा, हाडे दुखणे, सांधे दुखी, अस्वस्थ वाटू लागणे, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे आदी परिणाम होतात. त्यामुळे वापर जितका टाळता येईल, तितका टाळावा. अशा समस्या घेऊन येणारे चार ते पाच रुग्ण तरी दिवसाकाठी उपचारासाठी येत आहेत.

- डॉ. शरद पोवार, जनरल फिजिशियन

एक टन एसीला मागणी अधिक

सर्वसाधारणपणे एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर तेथे येणाऱ्या अभ्यागतांना बाहेरील उष्णतेचा परिणाम न जाणवता थंडावा जाणवावा, यासाठी ते कार्यालय संपूर्णपणे एसी केले जाते. बहुतांश कार्यालयांमध्ये एसी बसवलेला असतो.

आता मात्र अनेकांच्या घरांमध्ये झोपण्याची खोली किंवा हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पंख्यांसोबत एसी बसवून घेतले जातात. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढू लागले आहे. यात १.५ टन, १.८ टन, ५ टन क्षमतेच्या एसींना मागणी आहे. त्यात सर्वाधिक मागणी एक टन एसीला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT