कोल्हापूर : प्रचंड पाऊस पडतो त्यावेळी नदी, नाले, ओढे भरभरून वाहू लागतात. असं काय होतं की, हा नाला, ओढा अन् नदी ही अनेकदा आपलं मुळ पात्र बाजूला करुन दुसरीकडे वाहू लागतो. हे असं का होतं, असा विचार आपण अजिबात करत नाही; कारण नदी, नाल्याकाठची जी वृक्षसंपदा आहे. ती आपणच अनेक कारणांसाठी नष्ट केली. परिणामी, नदी, नाल्याचे पात्र हे प्रचंड पावसात बदलू लागले. ते भलत्याच ठिकाणी जाऊ लागलं. काठाला असलेले जे वृक्ष आहेत, त्यामुळे मुळ पात्र बदलत नव्हते. शिवाय काठावरील धूप कमी होत असे. आज ही स्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्या, ओढ्यांमध्ये झाली आहे. नदीकाठी धुप प्रतिबंध करणारा हा बच्चा (वाळुंज) आता क्वचित कुठे तरी दिसतो.
आपण वाळुंजाच्या झाडाची तोड केली. आत वाळुंज नसल्यामुळे कोल्हापूर शहरातील जयंती नाला असो की, पंचगंगा नदी. पावसाळ्यात ती अनेकदा आपली पात्र बदलताना दिसते.
वाळुंजला ग्रामीण भाषेत बच्चाचे झाड म्हणतात; तर सॅलिक्सटेरा स्पर्मा असे इंग्रजीत म्हणतात. जयंती नाला परिसरात पूर्वी वाळुंजची ही झाडे भरपूर होती. कात्यायनीच्या डोंगरात सुरु झालेला हा नाला. खरेतर ही जयंती नदी. कालांतराने जयंती नदीलाच सांडपाण्याचे स्वरुप झाले अन् तो बनला नाला. हा नाला पंचगेगला जाऊन मिळतो. खानविलकर पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या नाल्याभोवती वाळुंजची काही झाडे आजही दिसतात. खानविलकर पेट्रोल पंपापासून ते सीता कॉलनी, सिद्धार्थ नगर, जुना बुधवार पेठ ते पंचगंगा नदीपर्यंत ही वाळुंजची झाडे दिसतात. गर्द हिरवीगार असलेली झाडे लक्ष वेधून घेतात. या वाळुंजबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. ही झाडे नाल्याभोवती, नदीकाठीच का उगवतात? का दिसतात, याचा विचार आपण कधीच केलेला नसतो. नदी, नाल्याची धुप थांबवण्याचे महत्वाचे काम हा वाळुंज करतो. आता हा वाळुंज फारसा दिसत नाही. पूर्वी हा वाळुंज जयंती नाल्याभोवती भरपूर प्रमाणात दिसत असे. आता वाळुंजची अनेक झाडे वाळली आहेत. जी काहे झाडे आहेत. ती हळूहळू नष्ट होत आहेत.
हे पण वाचा - कुटुंब नियोजनावर असा झाला आहे कोरोनाचा परिणाम!
वाळुंजबरोबर नदीकाडी अजूर्न, वायवरना, करंज आदी झाडेही दिसतात. वाळुंज तोडल्याने नदीकाठी असलेली सुपीक मातीची झिज झाली. ही माती पुराने, पावसाने पंचगंगा नदीत आली. नदीचे पात्र उथळ झाले. परिणामी, थोडा जरी पाऊस झाला तरी नदीपात्र भरुन पाणी बाहेर पडू लागले. पावसाळ्यात पात्रात पाणी थांबत नाही; कारण ते उथळ झाले आहे. नदीत मातीचे थर वाढण्यास सुरवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांची आज ही अवस्था आहे. पुर येतो. नदी, नाल्याकाठी असलेली पिके नष्ट होतात. पाणी साठवून ठेवण्याची क्षमताच नष्ट झाली आहे. याबरोबर पाणी वाहून नेण्यासाठी नदीचे पात्र खोल लागते. या पात्रात सर्वत्र माती दिसते. हे सर्व वाळुंज सारखी झाडे नसल्याने घडले आहे. म्हणून प्रत्येकाने वाळुंजची झाडे आपल्या जयंती नाल्याभोवती, पंचगंगा नदीकाठी, आपल्या गावच्या ओढ्या, नदीकाठी लावले पाहिजे. वाळुंजचे संवर्धन केले पाहिजे.
हे पण वाचा - कोरोनाशी लढणार आता ही गोळी
""वाळुंजची लागवड मुद्दामहून कोणी करत नाहीत. नर्सरीमध्ये त्याची रोपे कोणीही करत नाहीत. वनीकरणावेळी नदीकाठी ते कोणीही लावत नाहीत. जी काही वाळुंजची झाडे आहेत. ते अनेकजण तोडत आहेत. नवीन झाडे लावत नाहीत. यामुळे नदी, ओढ्याकाठची सुपीक माती पात्रात जाते. पात्रे उथळ होतात. हे सर्व नुकसान शेतीबरोबर माणसाचे ही होत आहे. यासाठी वाळुंजसारखी झाहे प्रत्येकाने लावली पाहिजे. तरच नदीकाठची ही संपदा टिकेल. शेती, माती संवर्धित होईल.''
- डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.